मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivsena Vs Shinde: ठाकरे अन् शिंदे गटासाठी ७ तारीख महत्त्वाची, धनुष्यबाण चिन्हाचे काय होणार?

Shivsena Vs Shinde: ठाकरे अन् शिंदे गटासाठी ७ तारीख महत्त्वाची, धनुष्यबाण चिन्हाचे काय होणार?

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 04, 2022 01:57 PM IST

Shivsena Vs Shinde:शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आता चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोग करणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Shivsena Vs Shinde: शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आता चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोग करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने निवडणूक आयोगाच्या कोर्टात हा चेंडू टोलावल्यानंतर दोन्ही बाजूंना कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, अंधेरी पूर्वमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली असल्यानं त्याआधी चिन्हाचा निर्णय होईल का उत्सुकता लागेल.

ठाकरे गटाने शिंदे गटाची कागदपत्रे मिळावीत अशी मागणी केली होती. यानंतर निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला नोटीस बाजवली आहे. तसंच कागदपत्रांची यादी सादर करण्याचे आदेश दिलेत. ठाकरे गट त्यांच्याकडून ७ ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर करणार असल्याचे सांगता येत आहे. आता उत्सुकता लागून राहिली आहे ती म्हणजे निवडणूक जाहीर झाली तेव्हाची स्थिती चिन्हासाठी ग्राह्य धरण्यात येणार की चिन्ह गोठवण्यात येणार.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ७ ऑक्टोबरला अर्ज दाखल करता येणार आहे. तर निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी त्यादिवसापर्यंत मुदत आहे. त्यामुळे या कागदपत्रांवर निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. निवडणूक आयोग काय निर्णय देईल हे पाहावं लागेल.

धनुष्यबाण हे चिन्ह अधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाकडे कायम राहिल्यास शिंदे गट आव्हान देणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. यासंदर्भात शिंदे गट कायदेतज्ज्ञांशी चर्चा करत असल्याचंही समजते. ठाकरे गटाकडे चिन्ह कायम राहिलं तर काय पर्याय असतील यावर शिंदे गटाने लीगल विभागाची बैठक घेऊन चर्चा केली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या