छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना Vs शिवसेना सामना रंगणार, ५ मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना Vs शिवसेना सामना रंगणार, ५ मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले!

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना Vs शिवसेना सामना रंगणार, ५ मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले!

Oct 18, 2024 11:37 PM IST

Maharashtra Election 2024 : छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे ५ शिलेदार जवळपास निश्चित झाले आहेत. या पाचही उमेदवारांना तयारी करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले असून लवकरच त्यांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत.

संभाजीनगरात ५ मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले!
संभाजीनगरात ५ मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले!

Maharashtra Assembly Elections 2024 : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील उद्धवठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची घोषणा अद्याप झालेली नसतानाच उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमधील आपल्या पक्षाचे उमेदवार ठरवले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारांबाबत अंतिम निर्णय झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे५ शिलेदारजवळपास निश्चित झाले आहेत. या पाचही उमेदवारांना तयारी करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले असून लवकरच त्यांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्याकडून संभाजीनगर मधील पाच इच्छुकांना निवडणूक लढण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यांना तयारीला लागण्याचा दिल्या सूचना देखील दिल्या आहेत. पुढच्या दोन दिवसात एबी फॉर्म मिळतील. अर्ज दाखल करण्याची तयारी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. वैजापूरमधून दिनेश परदेशी यांना उमेदवारीचे संकेत मिळाल्याने कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवून केलं स्वागत करण्यात आले आहे. औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम,कन्नड,सिल्लोड आणि पैठण मतदारसंघातील उमेदवार निश्चित झाले आहेत.

ठाकरेंनी कोणा-कोणाला दिली संधी?

ठाकरेंनी आज पाच जणांचे तिकीट निश्चित केले आहे.छत्रपती संभाजीनगर मध्य या मतदार संघातून किशनचंद तनवाणी, छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून राजू शिंदे,वैजापूर मतदारसंघातून दिनेश परदेशी, कन्नड मतदारसंघातून उदयसिंह राजपूत आणि सिल्लोड मतदारसंघातून सुरेश बनकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

२०१९ च्याविधानसभा निवडणुकीत संभाजीनगर पश्चिममधून संजय शिरसाट,संभाजीनगर मध्य मधून प्रदीप जयस्वाल,वैजापूरमधून रमेश बोरनरे,कन्नडमधून उदयसिंह राजपूत तर सिल्लोडमधून अब्दुल सत्तार यांनी निवडणूक जिंकली होती.

यातले कन्नड मतदारसंघातील उदयसिंह राजपूत वगळता इतर चारही आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. शिंदेंसोबत गेलेल्या या आमदारांना पुन्हा एकदा तिकीट मिळणार असल्याचं निश्चित मानलं जातंय, त्यामुळे संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

Whats_app_banner