Shivsena UBT 24 star campaigners list : शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेसाठी ९६ उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकरून आता स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात २४ जणांचा समावेश आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यादीत शिवसेनेचे पदाधिकारी, आमदार, खासदार, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी यांचा समावेश आहे.
उमेदवार अर्जांची छाननी आज झाल्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निडवणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली जात आहे. काँग्रेसने ४० प्रचारकांची यादी आजच जाहीर केली असताना आता उद्धव ठाकरे गटाकडूनही २४ स्टार प्रचारकांची यादी जाहीर करत महाविकास आघाडीकडून प्रचारात आघाडी घेतली आहे.
निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दिवाळीच्या आधीच गाठीभेटीस सुरूवात केली आहे. काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सोशल मीडियावर प्रचारास सुरुवात केली असून विधानसभेसाठी आता सर्वच राजकीय पक्षांकडून राष्ट्रीय नेत्यांसह मुलूख मैदानी तोफा मैदानात उतरवण्यास सुरूवात केली आहे.
लोकसभेतील यशानंतर ठाकरे गटाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. ठाकरे गटाने ९६ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यानंतर आता ठाकरे गट उमेदवारांचा प्रचार करण्यास सज्ज झाला आहे. ठाकरे गटातील दिग्गज नेते त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.
उद्धव ठाकरे गटाची स्टार प्रचारकांची यादी –
01. उद्धव ठाकरे
02. आदित्य ठाकरे
03. संजय राऊत
04. अरविंद सावंत
05. भास्कर जाधव
06. अनिल देसाई
07. विनायक राऊत
08. आदेश बांदेकर
09. अंबादास दानवे
10. नितीन बानुगडे पाटील
11. प्रियांका चतुर्वेदी
12. सचिन अहिर
13. सुषमा अंधारे
14. संजय (बंडू) जाधव
15. किशोरी पेडणेकर
16. ज्योती ठाकरे
17. संजना घाडी
18. जान्हवी सावंत
19. शरद कोळी
20. ओमराज निंबाळकर
21. आनंद दुबे
22. किरण माने
23. प्रियांका जोशी
24. लक्ष्मण वडले
संबंधित बातम्या