मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ambadas Danve : निलंबनाचा फेरविचार व्हावा, अंबादास दानवेंनी व्यक्त केली दिलगिरी; सभापती काय घेणार निर्णय?

Ambadas Danve : निलंबनाचा फेरविचार व्हावा, अंबादास दानवेंनी व्यक्त केली दिलगिरी; सभापती काय घेणार निर्णय?

Jul 03, 2024 04:55 PM IST

ambadas danve : अंबादास दानवे यांनी सभापतींना पत्र लिहित दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचं निलंबन मागे घेण्याची शक्यता आहे.

अंबादास दानवे
अंबादास दानवे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपले निलंबनमागे घेण्याबाबत सभापतींना पत्र लिहिले आहे.सभागृहात भाजप नेते प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी सभापती निलम गोऱ्हे यांनीदानवे यांनानिलंबित केले होते. त्यांच्यावर पाच दिवसासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.विरोधी पक्ष नेत्यावर अशी कारवाई राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच झाली असेल. त्यावर आज अंबादास दानवे यांनी सभापतींना पत्र लिहित दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचं निलंबन मागे घेण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीविधानपरिषदेत गदारोळ झाला होता. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना सभागृहात शिवीगाळ केली होती. यानंतर त्यांच्यावर पाच दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. काही कारवाई करा म्हणणारे दानवे आता निलंबनाचा फेरविचार व्हावा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सभागृहातील वर्तनाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, माझ्याकडून अनावधानाने घडलेल्या घटनेमुळे मला निलंबित करण्यात आले. आमच्या पक्षप्रमुखांनी जाहीर दिलगीरी व्यक्त केली. माझ्या निलंबनाबाबत फेरविचार करावा अशी विनंती दानवे यांनी केली आहे.

विरोधी पक्षांकडून अंबादास दानवे यांचं निलंबन मागे घेण्याची विनंती करण्यात आल्यानंतर सभापती निलम गोऱ्हे यांच्या दालनात बैठक पार पडली. दरम्यान, यावर सत्ताधारी पक्षाने आम्ही आमचा निर्णय सभागृहात जाहीर करू अशी भूमिका मांडण्यात आली. आता अंबादास दानवे यांच्या निलंबनावर सभागृहात आज सायंकाळी निलम गोऱ्हे निर्णय जाहीर करणार आहेत.

अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,सोमवार दिनांक १ जुलै, २०२४ रोजी विधानपरिषद सभागृहात झालेल्या घटनेनंतर मला मंगळवार, दिनांक २ जुलै, २०२४ रोजी आपण ५ दिवसांसाठी निलंबीत केले. मी सभागृहाचा सदस्य म्हणून आतापर्यंत सातत्याने सभागृहाचे पावित्र्य, नियम,प्रथा व परंपरा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. परंतु दिनांक १ जुलै, २०२४ रोजी माझ्याकडून अनावधनाने घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केले. सभागृहाचं पावित्र्य राखण्यासाठी दिलगिरी व्यक्त करण्यात माझ्या मनात कोणताही किंतू नाही.

माझ्या वक्तव्यासंदर्भात आमच्या पक्षप्रमुखांनी जाहिरपणे दिलगीरी व्यक्त केली आहे,हे आपण जाणताच आणि माझीही भुमिका सभागृहाचे पावित्र्य कायम राहावे हीच आहे. त्यामुळे सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतू परंतू नाही.

सभागृहाचे कामकाज सुरु आहे, या स्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता- भगिणींचे अनेक प्रश्न मला सभागृहात मांडायचे आहेत. जेणेकरुन सरकार त्या प्रश्नाला न्याय देईल, त्यामुळे माझे निलंबन म्हणजे शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता-भगिणीचे प्रश्न सोडविण्यापासून मला थांबविणे असे होवू नये. या हेतूने माझ्या निलंबनाचा फेरविचार करावा अशी विनंती दानवे यांनी केलीय.

WhatsApp channel