मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बंडोबांनी उद्धव ठाकरेंना दाखवली केंद्राची भीती; शिवसैनिकांचे हल्ले थांबवा नाहीतर

बंडोबांनी उद्धव ठाकरेंना दाखवली केंद्राची भीती; शिवसैनिकांचे हल्ले थांबवा नाहीतर

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Jun 25, 2022 06:05 PM IST

बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरणार नसल्याचं शिवसेनेच्या बंडखोरांना आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केलं.

गुवाहाटीत एकवटलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार
गुवाहाटीत एकवटलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार

शिवसेना बंडखोर आमदारांनी त्यांच्या गटाला ‘बाळासाहेब ठाकरे’ यांचं नाव देणार नसल्याचं आज स्पष्ट केलं. आसामची राजधानी गुवाहाटी येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या बंडखोर गटाने प्रथमच देशभरातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बंडखोरांच्या वतीने कोकणातील सावंतवाडी मतदारसंघाचे शिवसेना आमदार, माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. 

केसरकर म्हणाले, ‘आम्ही अद्यापही शिवसेनेतच आहोत. आमच्याजवळ दोन तृतीयांश बहुमत आहे. आम्ही वेगळा गट बनवतोय. आमच्या गटाचं नाव ‘शिवसेना- बाळासाहेब ठाकरे’ असं ठेवून बाळासाहेबांच्या विचारधारेनुसारच काम करणार आहोत. आमच्या गटाला मान्यता दिली तर सगळे बंडखोर शिवसेना आमदार मुंबईत परततील. परंतु सध्या तिकडे परतण्याची परिस्थिती नाही. शिवसेना खासदार संजय राऊत हे शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून तोडफोड करण्याचे आवाहन करत आहेत. राज्यात ठिकठिकाणी शिवसेना आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले होत आहे. कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. मुख्यमंत्र्यांनी या शिवसैनिकांना शांतता राखण्याचे आवाहन करावे', अशी विनंती दीपक केसरकर यांनी केली.

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला केंद्र सरकारला महाराष्ट्रात हस्तक्षेप करण्याची आयती संधी मिळेल, असं केसरकर यांनी सांगितलं.

ते म्हणतात तर बाळासाहेबांचे नाव वापरणार नाही

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी स्वतःच्या बापाचे नाव वापरून मते मागावी. ‘ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचे नाव वापरू नये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरण्यावर बंदी घालण्याची विनंती शिवसेना पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. त्यावर बोलताना केसरकर म्हणाले की आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरणार नाही, असं सांगितलं.

गुवाहाटीत हॉटेलची व्यवस्था राजकीय पक्षाने केलेली नाही

शिवसेनेचे बंडखोर आमदार गेले चार दिवस गुवाहाटीत पंचतारांकीत हॉटेलमध्ये निवास करून आहेत. या हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च कोणता राजकीय पक्ष करत नसल्याचं केसरकर म्हणाले. ईडी चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यामुळे शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीत जमा झाले आहेत का, या प्रश्नावर केसरकर म्हणाले की केवळ दोन-तीन आमदारांमागे ईडी चौकशीचा ससेमिरा आहे. परंतु इतर आमदार हे शेतकरी असल्याचं केसरकर म्हणाले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या