Son Of Former Health Minister Tanaji Sawant Kidnapped : पुण्यातून मोठी बातमी समोर आली असून राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुणे विमानतळावरून अपहरण झाल्याची माहिती समोर आली. पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत कॉल आल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी दुपारी सावंत यांच्या मुलाला ड्रायव्हरने पुणे विमानतळावर सोडले होते. त्यानंतर त्या ठिकाणाहून मुलगा गायब झाल्याची माहिती आहे. माजी आरोग्य मंत्री विमानतळावर दाखल झाले आहेत. 'ऋषिराज सावंत असे तानाजी सावंत यांच्या मुलाचे नाव असून मिळालेल्या माहितीनुसार तो सुखरूप असल्याचं म्हटलं जात आहे.
शिवसेनेचे आमदार आणि माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा 'ऋषिराज सावंत याचे अपहरण झाले आहे. याबाबत पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. नऱ्हे परिसरातून स्विफ्ट गाडीतून त्याचे अपहरण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दोन व्यक्तींनी त्याचे अपहरण केल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, 'ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाल्याची तक्रार आमच्याकडे आली असून आम्ही तक्रार नोंदवली आहे. तानाजी सावंत यांनी आम्हाला सांगितले की, दोन जणांनी त्यांच्या मुलाला बँकॉकला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये जबरदस्तीने नेले. आम्ही डीजीसीएशी संपर्क साधला असून विमान भारतीय भूमीवर उतरवण्यात येणार आहे.
दरम्यान पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तानाजी सावंत यांचा मुलगा दुपारी सव्वाचार वाजता घरातून निघून गेला होता. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. पुणे विमानतळावरू तो चार्टर फ्लाईटने बँकॉकला गेल्याची माहिती आहे. या प्रकरणात तानाजी सावंत यांनी त्यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली गेली होती. पण प्राथमिक माहितीनुसार ऋषीराज सावंत याचे घरात वाद झाले होते, त्यानंतर तो बँकॉकला गेल्याचं समजतंय.
पोलिसांकडून विमान कंपनीशी संपर्क साधला जात असून बँकॉकला जाणारं हे चार्टर प्लेन भारताच्या हद्दीत असेल तर भारतातल्या विमानतळावरच उतरवलं जाणार आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या