मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एकनाथ शिंदेंची संपत्ती किती? एक रिव्हॉल्व्हर, ७ गाड्या, महाबळेश्वरमध्ये शेतजमीन

एकनाथ शिंदेंची संपत्ती किती? एक रिव्हॉल्व्हर, ७ गाड्या, महाबळेश्वरमध्ये शेतजमीन

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 25, 2022 01:19 PM IST

एकनाथ शिंदे यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीची माहिती दिली हो

मंत्री एकनाथ शिंदे
मंत्री एकनाथ शिंदे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

शिवसेनेत (Shivsena) बंडखोरी केल्यानंतर सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच चर्चा होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास ५० आमदार गुवाहाटीत (Guwahati) तळ ठोकून आहेत. गेल्या पाच दिवसांपासून गुवाहाटीत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आता सत्तास्थापनेसाठी शिष्टमंडळ स्थापन करण्याची तयारी केल्याचे समजते. शिवसेनेसह महा विकास आघाडी सरकारला धक्का देणाऱ्या एकनाथ शिंदे यांची संपत्ती किती आहे तुम्हाला माहिती आहे का?

एकनाथ शिंदे यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीची माहिती दिली होती. यात त्यांनी स्वत:कडे असलेल्या गाड्या, घर, मालमत्ता, सोने, गुंतवणूक आणि कर्जाबद्दल माहिती जाहीर केली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंच्या या संपत्तीची माहिती आता समोर आली आहे.

रिक्षाचालक ते आमदार आणि मंत्री ते बंडखोर शिवसैनिक इथंपर्यंत प्रवास केलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे २०१९ मध्ये ७ गाड्या होत्या. या सर्व गाड्यांची किंमत ४६ लाख रुपये इतकी होती. शिंदेनी त्यांच्याकडे स्कॉर्पिओ, बोलेरो, इनोव्हा, अरमाडा, टेम्पो इत्यादी वाहने असल्याचं सांगितलं होतं. यात दोन स्कॉर्पिओ आणि इनोव्हा, तर एक बोलेरो, अरमाडा आणि टेम्पो अशी वाहने होती.

सध्या कुटुंबियांच्या सुरक्षेवरून एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर तक्रार केली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे एक पिस्तूल आणि एक रिव्हॉल्व्हरही असल्याचं त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं होतं. शेतजमिनीची माहिती देताना एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे की, पत्नीच्या नावावर २८ लाख रुपयांची शेतजमीन आहे. २०१९ च्या बाजारभावानुसार त्यांनी ही किंमत सांगितली होती. महाबळेश्वरमध्ये एकनाथ शिंदे यांची १२ एकर जमीन आहे. तर चिखलगाव, ठाण्यात पत्नीच्या नावावर १.२६ हेक्टर जमीन असल्याचंही त्यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे.

पत्नीच्या नावावर वागळे इस्टेटमध्ये २० लाखांचा एक दुकानगाळा आहे. याशिवाय ठाणे पश्चिमेला वागळे इस्टेटमधील धोत्रे चाळीत एक घरही आहे. ३६० चौरस वर्गफूट क्षेत्रात हे घर आहे. लँडमार्क को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत २३७० स्क्वेअर फूटाचा अलिशान फ्लॅट आहे. याच सोसायटीत पत्नीच्या नावावरही एक फ्लॅट आहे. तर शिवशक्ती भवनमध्ये एक फ्लॅट आहे. त्यांचे घर आणि दुकानगाळ्यांचे सध्याचे मूल्य हे ९ कोटी रुपयांहून जास्त असल्याचं सांगण्यात येतंय. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर असलेल्या कर्जाची माहितीसुद्धा दिली होती. त्यानुसार त्यांच्यावर ३ कोटी ७४ लाख रुपयांचं कर्ज असल्याचं सांगितलं होतं. २०१९ च्या प्रतिज्ञापत्रात दिलेली ही माहिती असून गेल्या अडीच वर्षात किती संपत्ती वाढली हे समजू शकले नाही.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या