मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप दंगल घडवेल; मुस्लिमांनी..”, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप

“मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप दंगल घडवेल; मुस्लिमांनी..”, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 03, 2022 06:57 PM IST

मुंबई महापालिकेसाठी भाजप दंगल घडवण्याचा प्रयत्न करेल असा गंभीर आरोप करत, राज्यातील मुस्लिम बांधवांना भाजपचा डाव वेळीच ओळखावा, असे आवाहनही भास्कर जाधव यांनी केले आहे.

भास्कर जाधव
भास्कर जाधव

गुहागर– एकनाथ शिंदे यांनी बंड करून महाआघाडी सरकार पाडल्यापासून शिंदे गट व महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. त्यातच दहीहंडी व आता गणेशोत्सवातील गाठीभेटीवरून मुंबई पालिका निवडणुकासाठी समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक येत्या दोन-तीन महिन्यात कधीही जाहीर होऊ शकते. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मात्र शिवसेनेच्या हातातून महापालिकेची सत्ता हिसकावून घेण्याचा भाजपने जणू चंगच बांधला आहे. 

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई महापालिकेसाठी भाजप दंगल घडवण्याचा प्रयत्न करेल, राज्यातील मुस्लिम बांधवांना भाजपचा डाव वेळीच ओळखावा, असे आवाहनही जाधव यांनी केले आहे. 

मुंबई पालिका निवडणुकीवरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. भास्कर जाधव यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भास्कर जाधव यांनी गुहागर येथील एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केले. 

मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच कलगीतुरा रंगला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी थेट भाजपला लक्ष्य केलं आहे. जाधव म्हणाले की, ४० आमदार फोडून देखील लोकांचा आपल्याला पाठिंबा नाही हे भाजपच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे आता भाजप दोन समूहात दंगल भडकवण्याचा प्रयत्न करेल. काहीही करून मुस्लिम तरुणांनी डोकं शांत ठेऊन भाजपचा डाव ओळखावा व मुंबई महानगरपालिकेत पुन्हा शिवसनेनेला सत्तेत आणा, असे आवाहन भास्कर जाधव यांनी मुस्लिम समुदायाला केलं आहे. 

गुहागरमधील सभेत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी बंडखोर आमदारांना खुले आव्हान केले कि, हिंमत असेल तर राजीनामा देऊन जनमताला सामोरं जा. यावेळी त्यांनी रामदास कदम व नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला. यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

सत्तेत आणू, असे आवाहन भास्कर जाधव यांनी मुस्लिम समुदायाला केलं आहे. गुहागरमधील सभेत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. हिम्मत असेल तर राजीनामा देऊन लोकांच्या मताला सामोरे जा, असं खुलं आव्हान बंडखोर आमदारांना जाधव यांनी यावेळी केलं. माजी आमदार रामदास कदम यांच्यासह नारायण राणे यांच्यावरही भास्कर जाधव यांनी यावेळी हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. आता यावर भाजप काय प्रतिक्रिया देतंय? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

IPL_Entry_Point