मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : संजय राऊत 'आर्थर रोड' जेलमधून लिहिताहेत पुस्तक, कोणाचा करणार भांडाफोड?

Sanjay Raut : संजय राऊत 'आर्थर रोड' जेलमधून लिहिताहेत पुस्तक, कोणाचा करणार भांडाफोड?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 22, 2022 08:29 PM IST

दररोज सकाळी पत्रकार परिषदा घेऊन विरोधकांना जेरीस आणणारे संजय राऊत तुरुंगात काय करत असतील, असा प्रश्न लोकांच्या मनात येत असेल. तर नवीन समोर आलेल्या माहितीनुसीरसंजय राऊत सध्या कारागृहात एक पुस्तक लिहित आहेत. त्यात ते आपबिती सांगणार असल्याचे बोलले जातंय.

संजय राऊत
संजय राऊत

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊतांना पत्राचाळ प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर आता तिसऱ्यांदा कोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सोमवारी राऊतांच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणी कोर्टानं त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळं आता संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पाच सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दररोज सकाळी पत्रकार परिषदा घेऊन विरोधकांना जेरीस आणणारे संजय राऊत तुरुंगात काय करत असतील, असा प्रश्न लोकांच्या मनात येत असेल. तर नवीन समोर आलेल्या माहितीनुसीर संजय राऊत सध्या कारागृहात एक पुस्तक लिहित आहेत. त्यात ते आपबिती सांगणार असल्याचे बोलले जातंय.

खासदार संजय राऊत तुरंगात असले तरी त्यांची लेखणी अजूनही सक्रीय आहे. संजय राऊत तुरुंगात पुस्तक लिहित आहेत. नियमानुसार सुनावणी सुरू असलेल्या प्रत्येक कैद्याला पेन, पेपर यासारख्या वस्तू लिहिण्यासाठी दिल्या जातात. संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील गुन्ह्यांवर आधारित हे पुस्तक असेल, अशी माहिती मिळत आहे.  त्यामुळे संजय राऊत आपल्या पुस्तकातून कोणता भांडाफोड करणार? हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. 

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पीएमएलए (PMLA) अंतर्गत आर्थर रोड जेलमध्ये आहेत. आर्थर रोड जेलमधून (Arthur Road Jail) संजय राऊत पुस्तक लिहित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पत्रा चाळ गैरव्यवहारप्रकरणी इडीने संजय राऊत यांना अटक केली आहे. 

याआधी संजय राऊत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनासाठी संपादकीय लिहित असल्यामुळे वाद निर्माण झाला होता. यानंतर संजय राऊत यांच्या नावाचा उल्लेख सामनामध्ये करण्यात आला नाही. 

संजय राऊत पत्रा चाळ प्रकरणावरच पुस्तक लिहित आहेत, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.  मुख्य म्हणजे याच प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. आपल्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे आहेत, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असं राऊत आधीच म्हणाले आहेत.

IPL_Entry_Point