Lok Sabha election : लोकसभेसाठी भाजप-शिंदे गटाचा नवा फॉर्म्युला?; ‘इतक्या’ जागा लढवण्याचा प्रस्ताव
Lok Sabha election : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. जागा वाटापावरून महावीकस आघाडीत रस्सीखेच सुरू असताना भाजप आणि शिंदे गटाचा फॉर्म्युला ठरला आहे.
मुंबई: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. सध्या महावीकस आघाडीत जागावाटपावरुन दावे प्रतिदावे सुरू आहेत. तर भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपाचा वरून चर्चा झाल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने २०१९ मध्ये लढवलेल्या २३ पैकी २२ जागांवर दावा सांगितला असून भाजप २६ जागांवर निवडणूक लढणार अशी चर्चा आहे. दरम्यान, या या बाबत काय निर्णय होतो हे पुढील काही दिवसांत समजणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
New Parliament Inauguration : संसदेच्या उद्घाटनाला लाँच होणार ७५ रुपयांचं नाण; ‘हे’ आहेत वैशिष्ट्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत त्यांनी २२ जागा लढवण्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे.
शिवसेनेत फुट पडल्यावर शिवसेनेचे १३ खासदार हे शिंदे गटात सामील झाले आहेत. तर बाकी खासदार हे ठाकरे गटा सोबत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या या २२ जागांवर दावा सांगत या जागा लढवण्याचा निर्धार शिंदे गटाच्या नेत्यांनी केला आहे.
जर भाजप २६ आणि शिंदे गट २२ असा फॉर्म्युला ठरला तर या जागांवर विजय कसा मिळवायचा या बाबत काय रणनीती आखली जावी या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.