मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava: शिंदे अन् ठाकरेंच्या व्यासपीठावर एक खुर्ची राखीव, एकीकडे बाळासाहेबांसाठी तर दुसरीकडे…

Dasara Melava: शिंदे अन् ठाकरेंच्या व्यासपीठावर एक खुर्ची राखीव, एकीकडे बाळासाहेबांसाठी तर दुसरीकडे…

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 05, 2022 12:40 PM IST

Dasara Melava: उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर तर शिंदे बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेणार आहेत. या दोन्ही ठिकाणच्या मेळाव्यातील एका गोष्टीची सध्या चर्चा आहे ती म्हणजे दोन्ही ठिकाणी एक एक खुर्ची रिकामी ठेवली जाणार आहे.

शिंदे अन् ठाकरेंच्या व्यासपीठावर एक खुर्ची राखीव
शिंदे अन् ठाकरेंच्या व्यासपीठावर एक खुर्ची राखीव

Dasara Melava: शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे दोन वेगवेगळ्या मैदानावर एकाच वेळी होणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवाजी पार्कवर होईल तर शिंदे गटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे. या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने राज्यभरातून समर्थकांना येण्यासाठी बसची सोय केली आहे. तसंच मेळाव्यात येणाऱ्यांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

आजच्या दसरा मेळाव्याची चर्चा राज्यभरात सुरू आहे. दोन्ही नेते व्यासपीठावरून काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दोन्ही ठिकाणच्या दसरा मेळाव्यातील एका गोष्टीची सध्या चर्चा आहे ती म्हणजे दोन्ही ठिकाणी एक एक खुर्ची रिकामी ठेवली जाणार आहे. शिंदे गटाकडून व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची खुर्ची राखीव ठेवली जाणार आहे.

शिवाजी पार्कवरील ठाकरेंच्या मेळाव्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची ठेवण्यात येणार आहे. दोन आठवड्यांपूर्वी नेस्कोतील मैदानावर झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातही संजय राऊत यांच्या नावाने खुर्ची ठेवली होती. संजय राऊत हे सध्या तुरुंगात आहेत. त्यांना जामीन मिळाला नसल्यानं आता त्यांच्या नावाची खुर्ची आजच्या दसरा मेळाव्यात व्यासपीठावर ठेवली जाणार आहे.

बंड केल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले होते की, "हे बाळासाहेबांच्या विचाराचे सरकार आहे." आता मेळाव्यात त्यांच्या नावाने खुर्ची राखीव ठेवून आपणच बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक असल्याचं दाखवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असणार आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या