मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिंदे गटाचा दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात, लोकल ट्रेनच्या स्क्रीनवर सभेचे थेट प्रक्षेपण?

शिंदे गटाचा दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात, लोकल ट्रेनच्या स्क्रीनवर सभेचे थेट प्रक्षेपण?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 06, 2022 07:16 PM IST

उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्र्याच्या बीकेसी मैदानात झाला. दोन्ही मेळाव्यात एकमेकांवर तुफान हल्ले झाले. मात्र आणखी एका वेगळ्याच कारणामुळेएकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वादात सापडला आहे.

लोकल ट्रेनच्या स्क्रीनवर सभेचे थेट प्रक्षेपण?
लोकल ट्रेनच्या स्क्रीनवर सभेचे थेट प्रक्षेपण?

मुंबई– शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकारण बरेच तापलं होते. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावा (Eknath shinde) भरवण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा (shivsena Dasara melava) अखेर बुधवारी पार पडला. शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्क (शिवतीर्थ)वर आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीत पार पडला.

दोन्ही गटाकडून गर्दी खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा बुधवारी मुंबईमध्ये दसरा मेळावा पार पडला. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्र्याच्या बीकेसी मैदानात झाला. दोन्ही मेळाव्यात एकमेकांवर तुफान हल्ले झाले. मात्र आणखी एका वेगळ्याच कारणामुळेएकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वादात सापडला आहे.

<p>शिंदेची जाहीर सभा रेल्वेवर</p>
शिंदेची जाहीर सभा रेल्वेवर

मुंबईतील लोकल रेल्वे गाड्यात लावण्यात आलेल्या स्क्रीनवर एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याचे थेट प्रसारण करण्यात आल्याचे आता समोर आले आहे. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. बुधवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील एका लोकल ट्रेनच्या स्क्रीनवर बीकेसीतील एकनाथ शिंदेंच्या रॅलीचे प्रसारण सुरू होते. ही बाब निर्देशनात येताच रेल्वेने स्क्रीन लावण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळालेल्या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून अशाप्रकारे दसरा मेळाव्याची सभा लाईव्ह दाखवण्यास रेल्वे प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नव्हती. अशाप्रकारे राजकीय कार्यक्रम थेट कसा प्रक्षेपित केला गेला, याच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचेही पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलेआहे.

महसूल वाढवण्यासाठी म्हणून रेल्वेने केवळ जाहिरातींसाठी कंत्राटी पद्धतीवर रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये एलईडी स्क्रीन लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

IPL_Entry_Point