मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena Dasara Melava : अरे आव्वाज कुणाचाSS.. दसरा मेळाव्यात शिंदे की ठाकरे कुणाचा आवाज वरचढ ?

Shiv Sena Dasara Melava : अरे आव्वाज कुणाचाSS.. दसरा मेळाव्यात शिंदे की ठाकरे कुणाचा आवाज वरचढ ?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 06, 2022 09:53 PM IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या मेळाव्याचा आवाज मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यापेक्षा जास्त असल्याचा निष्कर्ष आवाज फाऊंडेशनने काढला आहे.

दसरा मेळाव्यात शिंदे की ठाकरे कुणाचा आवाज वरचढ?
दसरा मेळाव्यात शिंदे की ठाकरे कुणाचा आवाज वरचढ?

Shiv Sena Dasara Melava : बुधवारी देशभरात दसरा उत्सव मोठ्या (Shivsena dasara melava) उत्साहात पार पडला. मात्र राज्यात व संपूर्ण देशात चर्चा होती ती केवळ शिवसेनेच्या मुंबईत होणाऱ्या दोन दसरा मेळाव्यांची. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे झाले. एक मेळावा उद्धव ठाकरेंना परंपरागत शिवाजी पार्कवर तर दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचा बीकेसीत पार पडला. या दोन्ही मेळाव्यात गर्दी जमवण्याच्या बाबतीत एकनाथ शिंदे गटाने बाजी मारल्याची आकडेवारी पोलिसांनी दिली आहे तर या मेळाव्यात मोठा आवाज नेमका कोणाचा होता, ठाकरेंचा की शिंदेंचा? याची माहिती आता समोर आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या मेळाव्याचा आवाज मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यापेक्षा जास्त असल्याचा निष्कर्ष आवाज फाऊंडेशनने काढला आहे. आवाज फाउंडेशनने याबाबत एक रिपोर्टही जारी केली आहे. त्यानुसार शिवाजी पार्कच्या मेळाव्यात १०१.६ डेसिबल इतका आवाज होता, तर बीकेसी मेळाव्यात ८८ डेसिबल इतका आवाज नोंदवला गेला आहे.

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याचा आवाज जास्त असला, तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना वरचढ ठरले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आवाजाची पातळी ही ८८.४ डेसिबल होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाजाची पातळी थोडीशी अधिक म्हणजे ८९.६ डेसिबल नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात किशोरी पेडणेकर यांचा आवाज सर्वाधिक नोंदवला गेला. त्यांच्या भाषणावेळी ९७ डेसिबलपर्यंत आवाज गेला होता. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात सर्वाधिक आवाज खासदार धैर्यशील माने यांचा ८८.५ डेसिबल नोंदवला गेला.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या