मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ambadas Danve : निष्ठेचं रिटर्न गिफ्ट… विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेंना संधी!

Ambadas Danve : निष्ठेचं रिटर्न गिफ्ट… विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेंना संधी!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 08, 2022 06:44 PM IST

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर मराठवाड्यातील शिवसेना नेते अंबादास दानवे यांची वर्णी लावावी, असे पत्र उद्धव ठाकरे यांनीविधान परिषदेच्या सभापतींना पाठवलं आहे.

विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदीअंबादास दानवेंनासंधी
विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदीअंबादास दानवेंनासंधी

मुंबई–एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाळी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यानंतर राष्ट्रवादीकडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर हक्क सांगितला.राज्यातील सत्ता गमावल्यानंतर शिवसेनेने विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी हालचालींना सुरुवात केलीहोती. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर मराठवाड्यातील शिवसेना नेते अंबादास दानवे यांची वर्णी लावावी, असे पत्र उद्धव ठाकरे यांनीविधान परिषदेच्या सभापतींना पाठवलं आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेनेने दावा सांगितलेला होता. आज शिवसेनेनेआघाडी घेत उद्धव ठाकरेंच्या सहीने विधान परिषद सभापतींना पत्र लिहित मराठवाड्यातील अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर वर्णी लावावी, अशी शिफारस केली आहे.

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठीआमदार अंबादास दानवे यांच्याबरोबर सचिन अहिर,मनीषा कायंदे इच्छुक होत्या औरंगाबाद जिल्ह्यातून ६ आमदारांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणं पसंत केलं. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तिथेच ठाकरेंना जोरदार दणका बसला. अशा परिस्थितीत दानवेंना विरोधी पक्षनेतेपदी संधी देऊन मराठवाड्यात दानवेंच्या रुपाने शिवसेनेला बळ देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे.

 

<p>शिवसेनेने सभापतींना पाठवलेले पत्र</p>
शिवसेनेने सभापतींना पाठवलेले पत्र

उद्धव ठाकरेंचं सभापतींना पत्र

शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या दि. ९ जुलै २०२२ रोजी झालेल्या विधान परिषद सदस्यांच्या बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर नियुक्त करावयाच्या सदस्याचे नाव ठरविण्याचा अधिकार शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मला अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात आला. त्यानुसार मी महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर अंबादास एकनाथराव दानवे यांची नियुक्ती करावी,अशी शिफारस करत आहे.

WhatsApp channel