मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vinayak Mete: विनायक मेटे यांचे अपघातात निधन

Vinayak Mete: विनायक मेटे यांचे अपघातात निधन

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 14, 2022 08:01 AM IST

Vinayak Mete Accident: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघातात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे हे गंभीर जखमी झाले होते. त्याच्यासोबत वाहनचालक आणि बॉडीगार्डही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

विनायक मेटे
विनायक मेटे

Vinayak Mete Accident: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर अपघात झाला होता. या अपघातात विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. विनायक मेटे यांच्यासह त्यांचा बॉडीगार्ड आणि वाहनचालक गंभीर जखमी झाले होते. एक्सप्रेस वेवरील माडप बोगद्यामध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास गाडीचा अपघात झाला. अपघातानंतर त्यांना मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. अपघातात मेटे यांची गाडी एका बाजूने चक्काचूर झाली आहे. 

विनायक मेटे मुंबईला जात होते. त्यावेळी पनवेल खालापूर दरम्यान असणाऱ्या माडप बोगद्याजवळ अपघात झाला. ओव्हरटेक करणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीची जोरदार धडक बसली. या गाडीच्या डाव्या बाजुचे मोठे नुकसान झाले आहे. तसंच अपघातानंतर जवळपास तासभर मदत मिळू शकली नाही. विनायक मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती.

बीडकडून मुंबईला जात असताना एका ट्रकने विनायक मेटे यांच्या गाडीला कट मारला. अपघातानांतर १०० नंबरवर फोन करूनही काही प्रतिसाद मिळाला नाही आणि रस्त्यावर कुणीच मदत केली नाही. अखेर तासाभराने एक गाडी थांबली आणि आम्हाला मदत केली, तासाभराने अॅम्ब्युलन्स आल्याचं विनायक मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी सांगितले. अपघातानंतर मदतीला कुणीही आलं नाही. यंत्रणांनीसुद्धा मदत केली नाही असं कदम म्हणाले. अपघातावेळी मेटे यांच्यासोबत ते होते. या अपघातात एकनाथ कदम किरकोळ जखमी झाले आहेत. 

IPL_Entry_Point

विभाग