शिरूर लोकसभा मतदार संघ अलीकडे चर्चेचा विषय आहे. सगळ्यांनी त्यावर खूप प्रेम केले आहे. जो काही आपला निर्णय आहे तीन पक्ष जो निर्णय घेतील तो मान्य असेल पण मी एक सांगेल खासदारकीसाठी मी आक्रोश करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे. पण आक्रोश करणार नाही ज्यांना खासदारकीची आक्रोश करायचा त्यांनी करावा असा टोलाआढळराव पाटलांनी नाव न घेता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव न घेता त्यांनी काढलेल्या आक्रोश मोर्चाबाबत लगावला.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले,शिवसेनेचे मिशन ४८ आहे तसे माझी पण मिशन शिरूर मतदार संघाचा विकास हे आहे. माझा मागील निवडणुकीत
पराभव झाला मात्र मी थांबलो नाही विकास करत राहिलो. मतदार संघात पाच वर्ष वणवण फिरत आहे जेथे पराभव झाला त्या संघात पुन्हा नव चैतन्य मिळवून द्यायचे आहे. पाच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद मिळाली त्यामुळे मतदार संघातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यात यश आले.
धर्मवीर संभाजी महाराज स्मारकासाठी ४०० कोटींचा आराखडा मंजूर केला त्याचा नारळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्याहस्ते फोडावा अशी शंभू भक्तांची मागणी आहे पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या कामात प्रगती नाही त्यात मुख्यमंत्र्यानी लक्ष घालावे. कळमोडी प्रकल्प योजनेत लक्ष घालावे. भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांना वाढीव मोबदला मिळावा भात पिकाला अर्थसहाय्य व चांगली बाजार पेठ मिळावी यासाठी प्रयत्न व्हावेत
देवस्थान जोडणारे निधी मिळवा. पर्यटनासाठी चांगला वाव आहे त्यासाठी निधी मिळावा अशी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या भाषणातून माजी खासदार आढळराव पाटील यांनी मागणी केली.
मुख्यमंत्री म्हणाले, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महायुतीच्या जागा निवडून आणल्या पाहिजेत. विरोधकांकडे विरोध करण्यासाठी काहीच शिल्लक उरले नाहीत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. आम्ही काही बोललो तर त्यांना पाळता भुई कमी होईल. खोट बोलून शिवसैनिकांचा अपमान केला. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. कोव्हीड काळात मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांनी आम्ही काय केले हे आम्हाला शिकवू नये, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "शिवसेना वाचविण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी, शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबवण्यासाठी हे धाडस मी केले आहे. हे जगातील अनेक देशातील लोकांनी पहिले आहे ते करण्यासाठी धाडस आणि वाघाचे काळीज लागले,पुढे काय होईल याची पर्वा केली नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी मुख्यमंत्री पदाचा वापर,सत्तेचा वापर झाला पाहिजे. प्रत्येक नागरिकांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे अशी भावना आहे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत ४८ पैकी ४५ जागा निवडणून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करू असा संकल्प आज करू, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
संबंधित बातम्या