मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivaji Park pool : हिरव्या पाण्यामुळे शिवाजी पार्क स्विमिंग पूल नागरिकांसाठी बंद

Shivaji Park pool : हिरव्या पाण्यामुळे शिवाजी पार्क स्विमिंग पूल नागरिकांसाठी बंद

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 02, 2024 08:36 AM IST

Shivaji Park pool closed after water turns green : शिवाजी पार्क स्विमिंग पुलाचे पाणी हिरवे आणि खराब झाल्यामुळे हा पूल नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे.

शिवाजी पार्क स्विमिंग पुलाचे पाणी हिरवे आणि खराब झाल्यामुळे हा पूल नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे.
शिवाजी पार्क स्विमिंग पुलाचे पाणी हिरवे आणि खराब झाल्यामुळे हा पूल नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे.

Shivaji Park pool closed after water turns green : जलतरण करण्यासाठी प्रसिद्ध असलेला शिवाजी पार्क पार्क येथील स्विमिंग पुलाचे पाणी खराब झाले आहे. क्लोरिनच्या अतिवापरांमुळे या पुलाचे पाणी हिरवे झाले आहे. हे पाहणे पोहण्यासाठी योग्य नसल्याचा तक्रारी येथे येणाऱ्यांनी केल्या होत्या. या बाबत पालिका आयुक्तांना देखील पत्र व्यवहार करण्यात आला होता. याची दखल घेत हा जलतरण तलाव पोहण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अखेर गुरुवारी बंद केला आहे.

Maharashtra Weather update: पुणे, मुंबई गारठणार! विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात होणार घट; असे असेल हवामान

शिवाजी पार्क येथील जलतरण तलाव प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जलतरण करण्यासाठी अनेक नागरिक, तरुण आणि लहान मुले येत असतात. मात्र, या तलावातील पाणी खराब असल्याचा तक्रारी अनेक नागरिक करत होते. या पाण्यामुळे काही नागरिकांनी डोळे खराब झाल्याची देखील तक्रार केली होती. दरम्यान, काही दिवसांपासून येथील पाणी हे हिरवे झाले आहे. पाण्यात क्लोरिनचा अतिरिक्त वापर केल्यामुळे हे पाणी हिरवे झाले असून जलतरण करण्यासाठी योग्यही राहिले नाही. येथे येणारे सिंग यांनी या बाबत थेट पालिका आयुक्तांना पत्र लिहिले. जलतरण तलावातील पाणी हिरवे झाले असून त्याचा वापर कोणी करत नाही. “क्लोरीनचा अतिवापर होत आहे आणि हे आरोग्यासाठी चांगले नाही, असे सिंग म्हणाले.

NCP Split Verdict: राष्ट्रवादी शरद पवारांची की अजित पवारांची? १५ फेब्रुवारीला राहूल नार्वेकर सुनावणार फैसला

५० मीटरच्या या तलावातील पाण्याची गुणवत्ता ही गेल्या आठवडाभरापासून खराब होती, असे या जलतरण तलावाचे सदस्य जितेंद्र सिंग यांनी सांगितले. “गुरुवारी संध्याकाळी मात्र, परिस्थिती खराब झाली. पाणी हिरवे झाल्याने येथील सदस्यांनी तलाव व्यवस्थापक आणि उपायुक्तांकडे याची तक्रार केली होती, परंतु बीएमसी अधिकाऱ्यांनी कोणतहीही कावई केली नाही.

एका प्रशिक्षकाने सांगितले, "आम्ही सदस्यांना पूलमध्ये जाण्यास मनाई केली. कारण जर या पाण्यात कुणी बुडाले तर पाणी हिरवे असल्याने त्यांचा शोध घेणे कठीण होईल. तसेच आरोग्याच्या दृष्टीने देखील हे पाणी योग्य नाही.

जलतरण तलावाच्या व्यवस्थापक अर्चना देशमुख यांनी सांगितले की, ती गेल्या आठवड्यापासून मराठा आरक्षण ड्युटीवर आहे. त्यामुळे या तलावाबद्दल काहीच माहिती नाही."

उपमहापालिका आयुक्त किशोर गांधी म्हणाले, पाण्याची गुणवत्ता खराब असल्याने आम्ही पूल गुरुवारी बंद केला आहे. पंपांच्या दुरुस्तीनंतर काही प्रमाणात वीज ट्रिपिंग होते. दोन दिवसांनी दुरुस्ती करून पूल पुन्हा सुरू करण्यात येईल.

WhatsApp channel

विभाग