shivaji maharaj statue : त्या आपटेला आपटावासा वाटतोय; शिवपुतळा प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांचा संताप-shivaji maharaj statue collapse jitendra awhad slams sculptor jaydeep apte ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  shivaji maharaj statue : त्या आपटेला आपटावासा वाटतोय; शिवपुतळा प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांचा संताप

shivaji maharaj statue : त्या आपटेला आपटावासा वाटतोय; शिवपुतळा प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांचा संताप

Aug 29, 2024 11:09 AM IST

Jitendra Awhad slams Jaydeep apte : अवघ्या आठ महिन्यात पडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारणाऱ्या जयदीप आपटे याच्यावर आमदार जितेंद्र आव्हाड संतापले आहेत.

Shivaji Maharaj Statue Issue : त्या आपटेला आपटावासा वाटतोय; शिवपुतळा प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांचा संताप
Shivaji Maharaj Statue Issue : त्या आपटेला आपटावासा वाटतोय; शिवपुतळा प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांचा संताप

Jitendra Awhad slams Jaydeep apte : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. विरोधकांनी सरकारबरोबरच शिल्पकारालाही घेरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिल्पकार जयदीप आपटे याच्यावर सडकून टीका केली आहे. या आपटेला आपटावासा वाटतोय, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

जयदीप आपटे या २४ वर्षीय मूर्तीकारानं शिवरायांचा तो पुतळा साकारला होता. आपटेला पुतळा साकारण्याचा कुठलाही अनुभव नव्हता. तरीही त्याला ते काम दिलं गेलं आणि त्यानंही त्यास नकार न देता ते केलं. पुतळा पडल्याच्या घटनेनंतर आपटेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर भाष्य करताना आपटेवर जळजळीत टीका केली आहे.

कृष्णा कुलकर्णीच्या औलादी आजही जिवंत आहेत!

आव्हाड यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात, ‘मालवणच्या राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे हा फेसबुकवर आपल्या एका मित्राशी माजल्यासारखा बोलतो. त्याचा मित्रही याच्यासारखाच. पुतळ्याच्या डोक्यावर आठवणीची खूणही ठेवली आहेस, असं तो म्हणतो. त्यावर ‘पुतळा बनवताना पूर्ण अभ्यास करावा लागतो,’ असं आपटे सांगतो. जर आपटेने पुतळा साकारताना हाच अभ्यास केला असता तर महाराष्ट्राला अपमानित व्हावं लागलं नसतं. या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालं की आपल्या महाराजांवर वार करणाऱ्या अफजलखानाचा वकील कृष्णा कुलकर्णीच्या औलादी आजही जिवंत आहेत.

कुलकर्ण्यानं केलेला तो वार फक्त महाराजांवर नव्हता, तर तो वार स्वराज्यावर होता. मराठी मनावरची न मिटणारी जखम म्हणूनच महाराजांनी आपल्या तलवारीनं कुलकर्ण्याचं मुंडकं छाटलं, हा इतिहास आहे. परंतु, दोन मित्रांमधील फेसबुकवरील चर्चा आणि त्यामध्ये महाराजांच्या डोक्यावरील खुणेचा उल्लेख करून ती दाखवणं याची किळस येते! या आपटेला आपटावासा वाटतोय!!, असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.