Shivaji maharaj statue collapse : मागील वर्षी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले होते. उद्घाटन होऊन एक वर्ष होण्याआधीच महाराजांचा पुतळा कोसळला. २७ ऑगस्ट रोजी हा पुतळा कोसळला. त्यानंतर याप्रकरणी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून इंजीनिअरला अटक करण्यात आली आहे. मात्र अजूनही हा मुद्दा तापलेलाच आहे. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना चागलंच घेरलं आहे. आज महाविकास अघाडीकडून मुंबईत मार्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करत म्हटले की, पंडित नेहरू यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला होता, याबाबत उद्धव ठाकरे काँग्रेसकडून माफी मागून घेणार का, असा सवाल फडणवीसांनी केला आहे.
महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधातआज दक्षिण मुंबईत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत ‘जोडे मारो आंदोलन’ केले. त्यावरून फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पलटवार केला. फडणवीसांनी सूरतचा उल्लेख करत काँग्रेसवर हल्ला केला. त्यांनी म्हटले की, स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने आम्हाला शिकवले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. फडणवीस म्हणाले की, सूरत कधीही लुटली नाही. तेथील लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. काँग्रेस यासाठी माफी मागणार का?
महाराजांनी सुरत लुटली नव्हती, तर महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा योग्य त्या लोकांकडून घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं. पण सूरत कधी त्यांनी लुटली नव्हती. पण, जणू काही महाराज सामान्य माणसाची लुट करायला गेले होते, अशा प्रकारचा इतिहास आम्हाला शिकवला गेला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की,जवाहरलाल नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे लिहलं आहे, त्यासंदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का?
काँग्रेसने मध्यप्रदेशमध्ये कमालनाथ मुख्यमंत्री असताना ज्या प्रकारे शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझर लावून तोडला त्यावरती शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का बोलत नाहीत?
कर्नाटकमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून छत्रपतींचा पुतळा हटवण्यात आला,यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी शिवरायांचा पुतळा का हटवला?याबद्दल ते का बोलत नाहीत. आधी याचे उत्तर द्यायला हवे.