Jaydeep Apte look Out Notic : ठाण्यातील शिल्पकार जयदीप आपटे याला मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवण्याचे कंत्राट दिले होते. २६ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट येथे उभारलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन केल्यानंतर केवळ नऊ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत हा पुतळा कोसळला. या घटनेला आता आठवडा उलटून गेला तरी शिल्पकार जयदीप आपटे हा फरार आहे. मालवण पोलिसांनी आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरुद्ध निष्काळजीपणा आणि इतर गुन्ह्यांबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पाटील यांना कोल्हापुरातून अटक केली आहे. तर आपटेचा शोध सुरू आहे. जयदीप आपटे फरार असल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात लुक आउट नोटिस जारी केली आहे. तर विरोधकांनी सरकारवर या प्रकरणी टीका केली आहे.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे यांच्या विरोधात लुकआउट नोटिस जारी केली आहे. महायुती सरकार जयदीप आपटेला लपवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आरोपी लपला आहे की काय अशी शंका लोकांच्या मनात आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राच्या डीजीपी रश्मी शुक्ला यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
एखादा आरोपी देश सोडून पळून जाऊ नये यासाठी व त्याला रोखण्यासाठी विमानतळ आणि इतर सर्व ठिकांवार लुक आउट नोटिस जारी केल्यावर लक्ष ठेवलं जातं. ठाण्यातील शिल्पकार जयदीप आपटे याला मालवण येथे राजकोटला पुतळा उभारण्याचे कंत्राट दिले होते. या साठी कोट्यवधी रुपये मंजूर करण्यात आले होते. २६ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. हा पुतळा कोसळल्यावर मालवण पोलिसांनी आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरुद्ध निष्काळजीपणा आणि इतर गुन्ह्यांबद्दल गुन्हा दाखल केला. पाटील याला कोल्हापुरातून अटक केली आहे. चेतन पाटील याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
अवघा २४ वर्षांचा जयदीप आपटे हा कल्याण येथील रहिवासी आहे. जयदीप आपटे हा कल्याण येथील एका आर्टिस्टिक कंपनीचा मालक आहेत. लहानपणापासूनच त्याला शिल्प बनवण्याची आवड होती. मुंबईतील आर्ट स्कूलमधून त्याने पदवी संपादन केली. एवढा मोठा पुतळा बनवण्याचा अनुभव जयदीप आपटेला कधीच नव्हता, त्याला केवळ २ फूट उंचीचा पुतळा बनवण्याचा अनुभव आहे. एवढा उंच पुतळा उभारण्याचे कंत्राट नौदलाने कसे दिले, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.
जयदीप आपटेचा शोध घेण्यासाठी मालवण पोलिसांची ७ पथके तर महाराष्ट्रातील विविध जिल्हे व मुंबईतील बडे पोलिस अधिकारी जयदीप आपटेच्या शोधात आहेत. उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले की, मुख्यमंत्री शिंदे यांनी शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे परिचित जयदीप आपटे असून त्यांच्या सांगण्यावरून पुतळा उभारण्याचे कंत्राट त्यांना मिळाले आहे. आपटे हे अवघे २४ वर्षांचे असून त्यांना इतका उंच पुतळा बनवण्याचा अनुभव नाही. असा पुतळा बनवायला तीन वर्षे लागतात, असे आपटे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, मात्र त्यांनी हा पुतळा अवघ्या काही महिन्यांत बनवला.
मंगळवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री जयदीप आपटे यांचे शासकीय निवासस्थानात आपटे लपून बसला आहे का ? अशी शंका लोकांच्या मनात शंका आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "माफी मागण्याचा एक मार्ग आहे. याआधी मुख्यमंत्र्यांनी जोरदार वाऱ्यामुळे पुतळा पडल्याचे सांगितले होते. सिंधुदुर्ग प्रकरणातच नव्हे, तर बदलापूर प्रकरणातही एक आपटे आहेत. हे दोन्ही आपटे बेपत्ता आहेत.