मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena : वरळीत शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना धोबीपछाड

Shiv Sena : वरळीत शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना धोबीपछाड

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 02, 2022 02:16 PM IST

Shiv Sena vs Shinde Group In Worli : आदित्य ठाकरे हे वरळीतून आमदार आहेत. वरळी हा शिवसेनेचा अनेक वर्षांपासून बालेकिल्ला मानला जातो. परंतु वरळीतल्या शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

Shiv Sena vs Shinde Group In Worli Mumbai
Shiv Sena vs Shinde Group In Worli Mumbai (HT)

Shiv Sena vs Shinde Group In Worli Mumbai : दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष पेटलेला असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बालेकिल्ल्यातच शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. कारण आता वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळं आता आदित्य ठाकरेंना दसरा मेळाव्याआधी वरळीतच मोठा धक्का बसला आहे.

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा शिवसेनेसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. शिवसेनेत बंड झाल्यापासून आतापर्यंत अनेक स्थानिक पातळीवरील शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता ऐन दसरा मेळाव्याआधीच वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईतील वरळी मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. २०१९ मध्ये शिवसेनेकडून आदित्य ठाकरे या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेले आहेत. त्यामुळं आता ठाकरेंच्या मतदारसंघातच शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

दरम्यान आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला हायकोर्टानं शिवाजी पार्कवर परवानगी दिली आहे. याशिवाय शिंदे गटालाही पीएमआरडीएनं बीकेसी मैदानावर मेळाव्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यामुळं ऐन दसरा मेळाव्याआधीच शिंदे गटानं शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

IPL_Entry_Point