मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  फायनलमध्ये पीएम मोदी आणि आमित शाह खेळणार नाहीत, क्रिकेटमध्ये राजकारण आणू नका- संजय राऊत

फायनलमध्ये पीएम मोदी आणि आमित शाह खेळणार नाहीत, क्रिकेटमध्ये राजकारण आणू नका- संजय राऊत

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Nov 19, 2023 11:43 AM IST

Sanjay Raut Slams PM Modi and Amit Shah: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकातील अंतिम सामना खेळला जाणार आहे.

Sanjay raut
Sanjay raut

World Cup 2023 Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्चा नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगाणार आहे. या सामन्यात काहीच तास शिल्लक राहिले असून भारताने विश्वचषक जिंकावा, यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. तर, काही ठिकाणी हवन देखील करण्यात आले आहे. याच पाश्वभूमीवर भाजप कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नावाचा जयघोष करताना दिसत आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेटमध्ये राजकारण आणण्याची गरज नाही, फायनलमध्ये मोदी किंवा अमित शाह खेळणार नाहीत, अशा शब्दाद त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

संजय राऊत म्हणाले की, "या देशात, केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी राजकीय कार्यक्रम आयोजित केला जात आहे. क्रिकेटमध्ये राजकारण आणण्याची गरज नाही. पण ते अहमदाबादमध्ये केले जात आहे. जणू पीएम मोदी गोलंदाजी करतील, अमित शहा फलंदाजी करतील आणि भाजपचे नेते सीमारेषेवर उभे राहतील. पीएम मोदीमुळेच विश्वचषक जिंकला, असेही ऐकायला मिळेल. आपल्या देशात काहीही घडू शकते.s

विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. हे दोन्ही संघ २० वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार आहेत. २००३ च्या विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. मात्र, या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत आज मैदानात उतरेल. भारताने हा विश्वचषक जिंकला तर हे तिसरे विजेतेपद असेल. दुसरीकडे सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष असेल.

WhatsApp channel