Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला असून त्यात विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर करणे आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्याची ग्वाही देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, बहुतेक आश्वासने विरोधी महाविकास आघाडीच्या एकंदर आश्वासनांचा भाग आहेत.परंतु, काही असे मुद्दे आहेत. ज्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. राज्यातील विद्यार्थिनींना जसे शासनाच्या धोरणांतर्गत मोफत शिक्षण मिळत आहे, तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यास पुरुष विद्यार्थ्यांसाठीही ते लागू केले जाईल, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. महाविकास आघाडीजीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही स्थिर ठेवेल, असेही ते म्हणाले.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, या प्रकल्पाचा मुंबईवर परिणाम होणार असल्याने तो रद्द केला जाईल. झपाट्याने होणारे नागरीकरण लक्षात घेऊन महाराष्ट्र आणि मुंबईतही गृहनिर्माण धोरण असेल, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीसत्तेत आल्यास कोळीवाडे आणि गावठाणांचा क्लस्टर डेव्हलपमेंट रद्द करण्यात येईल आणि रहिवाशांना विश्वासात घेऊन हे काम केले जाईल, असे ठाकरे म्हणाले. रोजगार निर्मितीसाठी आपला पक्ष काम करेल, असेही शिवसेना प्रमुखांनी सांगितले.