छगन भुजबळ उसनं अवसान आणून मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत होते; भास्कर जाधव यांचा घणाघात
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  छगन भुजबळ उसनं अवसान आणून मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत होते; भास्कर जाधव यांचा घणाघात

छगन भुजबळ उसनं अवसान आणून मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत होते; भास्कर जाधव यांचा घणाघात

Jan 26, 2024 02:51 PM IST

Bhaskar Jadhav Slams Chhagan Bhujbal : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.

Chhagan Bhujbal - Bhaskar Jadhav
Chhagan Bhujbal - Bhaskar Jadhav

Bhaskar Jadhav Slams Chhagan Bhujbal : ‘छगन भुजबळ हे उसनं अवसान आणून मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत होते. पण उसनं अवसान आणून लढाई जिंकता येत नाही, त्यामुळं त्यांना शांत बसावं लागलं,’ असा सणसणीत टोला शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी आज हाणला.

मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळावं अशी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची मागणी आहे. हे आरक्षण कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातूनच देण्यात यावं, अशी आंदोलकांची मागणी आहे. मात्र, ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी नेते व संघटनांचा विरोध आहे.

Manoj Jarange Patil : मराठा मोर्चा मुंबईत प्रवेश करणार का?; मनोज जरांगे दोन वाजता निर्णय जाहीर करणार

छगन भुजबळ यांनी ओबीसीतून आरक्षण विरोधाची भूमिका जोरकसपणे मांडली होती. मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झाल्यानंतर छगन भुजबळ हे याबाबत बोलत होते. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ओबीसीमधून आरक्षण देऊ नका असं त्यांचं म्हणणं होतं. त्यासाठी ओबीसी समाजाचे मोर्चेही आयोजित करण्यात आले होते. जरांगे पाटलांवरही भुजबळांनी टीका केली होती. जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या टीकेकडं दुर्लक्ष करून आरक्षणावरच लक्ष केंद्रित केलं होतं.

सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळं त्यांनी विराट मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेनं कूच केलं. मोर्चातील आंदोलकांची संख्या दिवसागणिक वाढत गेली. मात्र, मोर्चा सुरू झाल्यापासून छगन भुजबळ यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली नाही. मनोज जरांगे यांच्या सर्व अभिनव मागण्या मान्य करून टाका, असं ते म्हणाले होते. चुकीच्या गोष्टीविरोधात बोलतच राहू. दोन्ही बाजूंचा विचार करून सरकार निर्णय घेईल, इतकंच ते म्हणाले होते. तसंच, ओबीसी संघटनांनी घेतलेल्या मेळाव्यांनाही त्यांनी दांडी मारली होती.

प्रजासत्ताक आहे कुठं?, असा भयंकर प्रश्न विचारण्याची वेळ आलीय; ‘सामना’तून मोदी राजवटीवर टीकास्त्र

या सगळ्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना अत्यंत खोचक प्रतिक्रिया दिली. 'छगन भुजबळ यांना विरोधात बोलण्यासाठी सांगण्यात आलं होतं. त्यासाठी ते जामिनावर असल्याची आठवण करून देण्यात आली होती. त्यामुळं ते उसनं अवसान आणून लढत होते. पण उसनं आवसान आणून लढाई जिंकता येत नाही. हे त्यांना समजल्यामुळं त्यांना आता घरी बसावं लागलं, असा टोला भास्कर जाधव यांनी हाणला.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर