Sushma Andhare : देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला; सुषमा अंधारे यांची जहरी टीका-shiv sena ubt dasara melava sushma andhare strongly attacks devendra fadnavis and bjp ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sushma Andhare : देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला; सुषमा अंधारे यांची जहरी टीका

Sushma Andhare : देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला; सुषमा अंधारे यांची जहरी टीका

Oct 24, 2023 08:12 PM IST

Sushma Andhare on Devendra Fadnavis : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यातून आज देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला.

Sushma Andhare - Devendra Fadnavis
Sushma Andhare - Devendra Fadnavis

Sushma Andhare on Devendra Fadnavis : छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा आज पार पडला. शिवसेनेची बुलंद तोफ अशी ओळख असलेल्या सुषमा अंधारे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत मेळाव्याला संबोधित केलं. सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणातून राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. 'देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नासवला,' अशी जहरी टीका अंधारे यांनी यावेळी केली.

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत कोटी-कोटींचे ड्रग्ज सापडत आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकार फेल ठरलं आहे. मी ड्रग्जची प्रकरणं चव्हाट्यावर आणतेय म्हणून देवेंद्र फडणवीस मला त्रास देण्यासाठी काही लोकांना पुढं करतायत, असा आरोप अंधारे यांनी केला.

हे कसले चाणक्य?

'देवेंद्र फडणवीस हे स्वत:ला चाणक्य म्हणवतात. काही लोकही त्यांना तसं म्हणतात. पण मला तसं अजिबात वाटत नाही. कारण चाणक्यानं माणसं घडवायची असतात. जसं शरद पवारांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ यांना घडवलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे, संजय राऊत, दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे अशा अनेकांना घडवलं. फडणवीसांनी कुणाला घडवलं. देवेंद्र फडणवीसांनी फक्त जमवलं. फडणवीसांनी त्यांच्या पक्षातील माणसं संपवण्याचं काम केलं. आज त्यांच्या पक्षात बोलायलाही लोक नाहीत. विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांना संपवलं. आता ते चंद्रकांत पाटील यांच्या मागे लागलेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

‘देवाभाऊ, तुमच्याकडं महाशक्ती आहे. जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. तुमच्याकडं सगळं आहे, तरीही शिवसेना आणि राष्ट्रवादीतून उचलेगिरी कशापायी करता. रेडिमेड, होलसेल माल का उचलता? तुम्ही कसले चाणक्य?,’ असा खोचक सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

Whats_app_banner