Sushma Andhare : तुरुंगात जाईन पण माफी अजिबात मागणार नाही; सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंना सुनावलं!-shiv sena thackeray camp leader sushama andhare letter over vidhan parishad vice chairman neelam gorhe asks to apologize ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sushma Andhare : तुरुंगात जाईन पण माफी अजिबात मागणार नाही; सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंना सुनावलं!

Sushma Andhare : तुरुंगात जाईन पण माफी अजिबात मागणार नाही; सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंना सुनावलं!

Dec 23, 2023 01:59 PM IST

Sushma Andhare Reply to Neelam Gorhe : विधान परिषेदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांची बदनामी केल्या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माफी न मागितल्यास हककभांगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अंधारे यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे.

Sushama Andhare criticized Neelam Gorhe
Sushama Andhare criticized Neelam Gorhe

Neelam Gorhe vs Sushma Andhare : विधान परिषेदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांची बदनामी केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माफी न मागितल्यास हककभांगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांना त्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी माफी मागण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. तुरुंगात जाईन पण माफी अजिबात मागणार नाही असं त्यांनी सुनावलं आहे.

Pune Girl rape : घरमालकाच्या मुलीवर भाडेकरूचा बलात्कार! छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

नागपूर हिवाळी अधिवेषनादरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची बदनामी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान, सभागृहात या मुद्द्यावरुन भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव मांडला होता. यावर चर्चा देखील झाली होती. सभागृहात मोठा गदारोळ झाल्यावर सुषमा अंधारेंनी येत्या आठ दिवसांत दिलगिरी पत्र द्यावे अन्यथा त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची परवानगी देऊ, असा इशारा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिला होता.

मात्र, सुषमा अंधारे यांनी लेखी माफी मागण्यास नकार दिला आहे. सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना एक जाहीर पत्र लिहिले आहे. याद्वारे त्यांनी त्यांची भूमिका सविस्तरपणे मांडली आहे. यात त्यांनी माफी मागण्यास नकार दिला असून माझ्याकडून जर एखादा गुन्हा घडला असता तर मी बिनशर्त माफी मागितली असती. पण पक्षीय राजकारणातील कुरघोडीचा भाग म्हणून कोणी मला जर झुकन्याचा प्रयत्न होत असले तर मी माफी मागणार नाही. या साठी मला तुरुंगात पाठवले तरी मी जाईन पण माफी मागणार नाही अशी भूमिका अंधारे यांनी घेतली आहे. त्यामुळे आता नीलम गोऱ्हे या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारतील का या कडे सर्वांचे लक्ष आहे.

Whats_app_banner