Nashik Teacher Constituency Election: नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे गटाने मारली बाजी! किशोर दराडे विजयी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Teacher Constituency Election: नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे गटाने मारली बाजी! किशोर दराडे विजयी

Nashik Teacher Constituency Election: नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे गटाने मारली बाजी! किशोर दराडे विजयी

Jul 02, 2024 10:03 AM IST

Nashik Teacher Constituency Election Kishor Darade won : नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चुरशीची झाली असून या निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी बाजी मारली आहे. त्यांचा दणदणीत विजय झाला आहे. गेल्या २४ तासांपासून मतमोजणी सुरू होती.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे गटाने मारली बाजी! किशोर दराडे विजयी
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे गटाने मारली बाजी! किशोर दराडे विजयी

Nashik Teacher Constituency Election: राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली आहे. शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांच्या निवडीची घोषणा होताच त्यांच्या करकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला. दराडे यांनी विवेक कोल्हे यांचा पराभव केला आहे. 

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी गेल्या २४ तासांपासून मतमोजणी सुरू होती. पहिल्या पसंतीच्या विजयाचा कोटा पूर्ण झाल्यावर दुसऱ्या पसंतीच्या मतांना मोजणीला आज सकाळी सुरुवात करण्यात अली होती. पहिल्या व दुसऱ्या मतांच्या मोजणीत देखील शिवसेनेचे किशोर दराडे हे आघाडीवर होते. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे दुसऱ्या क्रमांकावर होते. दोन्ही उमेदवारांमद्धे सामना चुरशीचा दिसत होता. मात्र, अखेर विजय दराडे यांनी सर्वाधिक मते मिळवत विवेक कोल्हे यांचा पराभव करत विजय मिळवला.

चुरशीची निवडणूक

नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चुरशीची झाली. गेल्या २४ तासांपासून मतमोजणी सुरू होती. या निवडणुकीत पैसे वाटपाचे आरोप देखील झाले. तसेच काल गैर प्रकार झाल्याच्या आरोपावरून मतमोजणी काही काळ थांबवण्यात देखील आली होती. मात्र, यानंतर पुन्हा मतमोजणी सुरू करण्यात आली. या मतदार संघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाचा उमेदवार देखील निवडणूक रिंगणात होता. मात्र असे असले तरी खरी लढत ही अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे व किशोर दराडे यांच्यात झाली. दोघांनाही कमी अधिक मते होती. मात्र, आज सकाळी झालेल्या मतमोजणीत किशोर दारडे पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकाच्या कोट्यात पहिल्या स्थानावर होते. आज सकाळी किशोर दराडे यांचा विजय झल्याची घोषणा करण्यात आली.

सोमवारी, मतमोजणी दरम्यान, पाच मतपत्रिका जास्त आढळल्या होत्या. नाशिक जिल्ह्यातील निफाड व येवला येथील मतपेटीत १ मतपत्रिका जास्त आढळूली तर चोपडा तालुक्यातील मतपेटीत ३ मतपत्रिका जास्त आढळल्या. शिवसेना ठाकरे गटाने यावर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे काही काळ मतमोजणी थांबवण्यात आली होती. मात्र, थोड्या वेळानंतर पुन्हा मतमोजणी सुरू करण्यात आली. नाशिक शिक्षक मतदारसंघात एकूण ९३.४८ टक्के मतदान झाले. यातील ६४ हजार ८४८ मते वैध ठरवली गेली.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीत किशोर दराडे (शिवसेना) यांना तपशीलवार मतमोजणीअंती २६ हजार ४७६  मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी ३१  हजार ५७६  इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा १९ व्या वगळणीफेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची ३२  हजार ३०९  मतांनी नाशिक शिक्षक मतदार संघातून निवडून आले, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जाहीर केले.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण ३०  टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण ६४  हजार ८५३ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी ६३  हजार १५१ मते वैध ठरली तर १ हजार ७०२  मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी ३१ हजार ५७६  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

कोटा निश्चित झाल्यानंतर बाद फेऱ्यांचे मतमोजणी सुरू झाली. यामध्ये १९  व्या बाद फेरीनंतर  संदीप गुळवे (पाटील) हे बाद झाले असून अंतिम लढत किशोर दराडे व विवेक कोल्हे या दोन उमेदवारामध्ये झाली. यामध्ये जिंकून येण्यासाठी  ३१  हजार ५७६   इतक्या मतांचा कोटा निश्चित केला होता.  दराडे यांनी कोटा पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची ५  हजार ६०  मते मिळवून विजयी झाले. विवेक कोल्हे याना तिसरा फेरी अखेर १७  हजार ३९३  मते पडली असून सर्वाधिक पसंती क्रमाची ६  हजार ७२  मते पडली. मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाच्या परवानगीने डॉ.गेडाम यांनी यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर