मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut: संजय राऊतांना दिलासा नाहीच! न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला

Sanjay Raut: संजय राऊतांना दिलासा नाहीच! न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 05, 2022 02:59 PM IST

Sanjay Raut Custody Extends : पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी कोठडीत असलेले संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. तूर्तास दिलासा मिळण्याची चिन्हे नसून न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यन्त त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढवला आहे.

Shiv Sena MP Sanjay Raut (PTI)
Shiv Sena MP Sanjay Raut (PTI) (PTI)

मुंबई : मुंबई : पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यांना १९ सप्टेंबरपर्यंत कारागृहात ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं दिले आहेत. यामुळे संजय राऊत यांना तूर्तास तरी दिलासा मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

मुंबईतील पत्राचाळ जमीन व्यवहारात गैर प्रकार करून तब्बल १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा संजय राऊत यांचावर आरोप आहे. या प्रकरणी ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. ईडीने संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली होती. या नंतर त्यांना ईडीने ८ विवसांची कोठडी देण्यात आली होती. दरम्यान संजय राऊत यांच्या पत्नीचीही चौकशी ईडीने केली होती. ८ दिवसाच्या कोठडीनंतर राऊत यांना २२ ऑगस्ट पर्यन्त न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. न्यायालयाने संजय राऊत यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात केली होती. नायल्याने त्यांना घरचे जेवण तसेच लिहिण्या वाचण्याची परवानगी दिली होती. दरम्यान त्यांचा आज १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा आज न्यायालयात उभे करण्यात आले होते. मुंबई सत्र न्यायालयाने संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. त्यांना १९ सप्टेंबरपर्यन्त तुरुंगात ठेवले जाणार आहे.

गोरेगाव येथिल पत्राचाळीचा म्हाडाचा भूखंड हा प्रवीण राऊत यांच्या कंपनीला विकसित करण्यासाठी दिला होता. दरम्यान, प्रवीण राऊत यांनी हा भूखंडाचा काही भाग परस्पर खासगी बिल्डरला १०० कोटी रुपयांना विकला. त्यांनी येथे राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. यात संजय राऊत यांचाही सहभाग असल्याचा ईडीचा आरोप आहे. HDIL ग्रुपकडून मिळालेल्या ११२ कोटी रुपयांपैकी १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. यावरुन संजय राऊत यांची ईडी मार्फत चौकशी सुरू असून त्यांना अटक करण्यात आली होती. आता त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ केल्याने तूर्तास तरी संजय राऊत यांना या प्रकरणातून दिलासा मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

IPL_Entry_Point

विभाग