मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sunil Raut: संजय राऊत यांच्या भावाबद्दलच फुटीची चर्चा; सुनील राऊत म्हणाले…
Sunil Raut
Sunil Raut
27 June 2022, 12:05 ISTGanesh Pandurang Kadam
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 12:05 IST
  • Sunil Raut Slams Shiv Sena Rebels: बंडखोर गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे.

Sunil Raut slams Shiv Sena Rebels: शिवसेनेतील बंडखोर आमदारांविरोधात चवताळून उठलेले, मेळाव्यांच्या माध्यमांतून शिवसैनिकांना विश्वास देणारे व मीडियातही पक्षाची बाजू खंबीरपणे मांडणारे खासदार संजय राऊत हेच बंडखोर गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा कालपासून सुरू झाली आहे. खुद्द सुनील राऊत व संजय राऊत यांनी यावर खुलासा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सुनील राऊत यांनी ही चर्चा म्हणजे अफवा असल्याचं म्हटलं आहे. 'कोणाला काय बातम्या पेरायच्या त्या पेरू द्या. विजय उद्धव ठाकरे यांचाच होणार आहे. मी शिवसेनेतच आहे आणि राहीन, असं सुनील राऊत यांनी म्हटलं आहे.

‘गुवाहाटीला मी कशासाठी जाईन? गद्दारांचे चेहरे बघायला तिकडं जाऊ का? त्यापेक्षा गोव्याला जाऊन मी निसर्गसौंदर्याचा आनंद घेईन. मी बाळासाहेबांचा एक शिवसैनिक आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत पक्षासाठी काम करत राहीन. आमच्यासाठी आमदारकी मोठी गोष्ट नाही. जे कोणी आमच्यासोबत आहेत, त्यांच्या मदतीनं महाराष्ट्रात आम्ही शिवसेना पुन्हा वाढवू,’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘महाविकास आघाडीवर आरोप करणाऱ्यांचे अडीच वर्षांपूर्वीची वक्तव्य बघा. भाजपमुळं शिवसेना संपतेय असं हेच लोक म्हणत होते. विधानसभा निवडणुकीत आमचे उमेदवार भाजपनंच पाडले असं त्यांचं मत होतं. त्यांच्याच या भूमिकेमुळं महाविकास आघाडीचा प्रयोग केला गेला. भाजपला ताकद दाखवण्याचा निर्णय घेतला गेला. मला २० कोटींचा फंड मिळाला. कुणी दिला फंड? भाजपसोबत असताना किती फंड मिळाला होता ते बंडखोरांना विचारा, असंही राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले…

'सुनील राऊत हे माझ्यासोबतच आहेत. तेच सध्या सर्व मोर्चा सांभाळत आहेत. काय होईल, ते तुम्हाला लवकरच कळेल. या सगळ्याचा उलगडा लवकरच होईल, असं राऊत म्हणाले.