Sanjay Gaikwad Thrashes Youth: पोलिसांसमोरच तरुणाला बेदम मारहाण; संजय गायकवाड यांचा व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Gaikwad Thrashes Youth: पोलिसांसमोरच तरुणाला बेदम मारहाण; संजय गायकवाड यांचा व्हिडिओ व्हायरल

Sanjay Gaikwad Thrashes Youth: पोलिसांसमोरच तरुणाला बेदम मारहाण; संजय गायकवाड यांचा व्हिडिओ व्हायरल

Mar 02, 2024 09:24 PM IST

Sanjay Gaikwad Buldhana Video: संजय गायकवाड यांचा तरुणाला बेदम मारहाण करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Sanjay Gaikwad Viral Video
Sanjay Gaikwad Viral Video

Sanjay Gaikwad Thrashes Youth: शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. संजय गायकवाड यांनी शिवजयंती मिरवणुकीत एका तरुणाला पोलिसांच्या लाठीने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदारांकडून कायदा हातात घेत अशी मारहाण केल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओ बुलडाणा येथील शिवजयंती मिरवणुकीचा (१९ फेब्रुवारी २०२४) आहे. गायकवाड यांनी पोलिसांना एका तरुणावर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्वत: संजय गायकवाड यांनी पोलिसांच्या हातातून दंडुका घेत तरुणावर प्राणघातक हल्ला केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे संतापाची लाट उसळली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतरनंतर गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

यापूर्वी, संजय गायकवाड यांनी त्यांच्या गळ्यात असलेला दात वाघाचा आहे, असा दावा केला होता. एवढेच नव्हेतर, या वाघाची त्यांनी स्वत: शिकार केली, असेही सांगितले होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये संजय गायकवाड यांनी शिवरायांच्या मावळ्याचा पेहराव केल्याचे दिसत आहे. यावेळी संजय गायकवाड यांना त्यांच्या गळ्यातील एका लॉकेटबाबत विचारले असता ते म्हणाले की, तो वाघाचा दात आहे. त्यांनी ३७ वर्षांपूर्वी एका वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यात घातल्याचे व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर