Shiv Sena MLA Disqualification Case : राज्याच्या राजकारणातील आज महत्वाचा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत मागणी केली होती. तर शिंदे गटाने देखील ठाकरे गटाचे १४ आमदार अपात्र ठरवण्यात यावे या साठी कोर्टात धाव घेतली. तब्बल दीड वर्ष हा संघर्ष कोर्टात सुरू होता. अखेर कोर्टाने हा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात ढकलला होता. विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अनेकदा कोर्टाने खंडसावल्यानंतर आज ते या बाबत निकाल देणार आहे. त्यामुळे कोणते आमदार अपात्र आणि कोणत्या गटाचे आमदार पात्र ठरतील या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जर शिंदे गटाचे आमदार अपात्र झाले तर भाजपचा प्लॅन बी काय असेल याची देखील चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेतून बंड करत एकनाथ शिंदे हे १६ आमदारासोबत गुवाहाटीला गेले होते. यानंतर महावीकास आघाडीसरकार कोसळले होते. दरम्यान, यानंतर उद्धव ठाकरे गट शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरवण्यात यावे या साठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, शिंदे गट देखील उद्धव ठाकरे गटातील १४ आमदार अपात्र ठरवण्यात यावे या साठी कोर्टात गेले होते. या वर तब्बल दीड वर्ष सूनवण्या झाल्या. कोर्टाने तारीख पे तारीख करत हा निर्णय विधानसभा अध्यक्ष यांना या बाबत निकाल देण्याचे सांगितले. दरम्यान, हा निकाल देऊन देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप या बाबत निकाल दिला नव्हता. यामुळे ठाकरे गटाने पुन्हा कोर्टात धाव घेत या बद्दल निकाल देण्याची मागणी केली होती. दरम्यान, कोर्टाने राहुल नार्वेकर यांना फटकारत निकाल लवकर जाहीर करण्यासाठी वेळेची मुदत दिली होती. त्यानंतर अखेर आज हा निकाल घोषित केला जाणार आहे.
आज आमदार अपात्र प्रकरणी निकाल लागणार असल्याने काल रात्री पासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बैठका सुरू आहेत.
शिंदे गटाने आमदार आदित्य ठाकरे आणि अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या ठाकरे गटाच्या आमदार ऋतुजा लटके यांच्या विरोधात याचिका दाखल केलेली नाही. यामुळे इतर उद्धव गटाच्या इतर १४ आमदार अपात्र ठरवण्यात यावे अशी शिंदे गटाची मागणी आहे. तर उद्धव ठाकरे गटाची शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरवण्यात यावे अशी मागणी केले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे, एकनाथ शिंदे, चिमणराव पाटील, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाठ, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, संजय रायमूळकर, रमेश बोरनारे, महेश शिंदे यांच्यावर आपत्रतेची टांगती तलवार आले.
तर ठाकरे गटातील अजय चौधरी, रवींद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख, सुनिल राऊत, सुनिल प्रभू, भास्कर जाधव, रमेश कोरगावंकर, प्रकाश फातर्फेकर, कैलास पाटील, संजय पोतनीस, उदयसिंह राजपूत, राहुल पाटील यांच्यावर आपत्रतेची टांगती तलवार आहे.