mumbai murky water : मुंबईत नळातून येतंय गढूळ पाणी, पोट बिघडण्याची भीती, लोकांच्या तक्रारीनंतर आदित्य ठाकरे मैदानात
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  mumbai murky water : मुंबईत नळातून येतंय गढूळ पाणी, पोट बिघडण्याची भीती, लोकांच्या तक्रारीनंतर आदित्य ठाकरे मैदानात

mumbai murky water : मुंबईत नळातून येतंय गढूळ पाणी, पोट बिघडण्याची भीती, लोकांच्या तक्रारीनंतर आदित्य ठाकरे मैदानात

Aug 15, 2024 02:11 PM IST

Aaditya Thackeray Letter to BMC: मुंबईकरांना नळातून येतय गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्याने शिवसेना यूटीबी पक्षाचे आमदार आदित्य ठकारे यांनी मुंबई महानगरपालिकेला पत्र लिहिले आहे.

मुंबईकरांच्या नळातून येतय गढूळ पाणी
मुंबईकरांच्या नळातून येतय गढूळ पाणी

Aaditya Thackeray on Mumbai murky water : मुंबईकरांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी मिळत आहे. या पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित त्रास जाणवत असल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. मुंबई महानगरपालिकेला जाब विचारत आदित्य ठाकरे म्हणाले की, यासंदर्भात महापालिकेने खुलासा करावा, नाहीतर मुंबईकर पालिकेच्या दारात येतील, असेही ते म्हणाले.

या संदर्भात नुतकेच आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले. ज्यात त्यांनी असे म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून, मुंबईकर एकतर गढूळ पाणी किंवा अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी करत आहेत, ज्यामुळे तब्येतीच्या समस्या वाढत आहेत. काही वॉर्ड्समध्ये पूर्वीपेक्षा कमी दाबाने पाणी येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अनेक घरांना पूर्वीपेक्षा कमी दाबाने पाणी

संपूर्ण मुंबईतून इतक्या मोठ्या संख्येने तक्रारी आल्याचे आणि मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासन मुंबईबद्दल इतके बेफिकीर असल्याचे मी प्रथमच पाहतो आहे. उन्हाळ्यात मुंबईकरांना कमी पाणी मिळालेच, आता पुन्हा अनेक इमारतींना, चाळींना आणि वस्त्यांना कमी पाणी मिळत आहे, असेही आदित्य ठाकरे याांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरेंची मुंबई महानगरपालिकेकडे मागणी

जर महानगरपालिकेला संतप्त मुंबईकर त्यांच्या दारात उभे राहून जाब विचारायची वेळ यायला नको असेल, तर त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन मुंबईला घाण पाणी किंवा कमी पाणी का मिळत आहे? याचा खुलासा करावा अशी मागणी मी मुंबई महानगरपालिकेकडे करत आहे. महापालिका आयुक्तांनी स्वत: ही पत्रकार परिषद घेतली तर उत्तम!

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर