मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aditya Thackeray : ५० थर लावले की तुमचा थरकाप उडालाय.. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

Aditya Thackeray : ५० थर लावले की तुमचा थरकाप उडालाय.. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 19, 2022 06:26 PM IST

दीड महिन्यापूर्वी आम्ही ५० थर लावून सर्वात मोठीदहीहंडी फोडली, अवघड होते मात्र शेवटी आम्ही ती हंडी फोडलीच असे म्हटले होते. याला शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

मुंबई -  ठाण्यातील टेंभी नाका येथे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या दहीहंडी उत्सवाला आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी तुफान राजकीय टोलेबाजी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. दीड महिन्यापूर्वी आम्ही ५० थर लावून सर्वात मोठी दहीहंडी फोडली, अवघड होते मात्र शेवटी आम्ही ती हंडी फोडलीच असे म्हटले होते. याला शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आम्ही ५० थरांची सर्वात अवघड दहीहंडी फोडली आणि सर्वांच्या आशीर्वादाने हे सरकार अस्तित्वात आले, यावर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. तुम्ही ५० थर लावले की तुमचा थरकाप उडायलाय हे सर्वांना माहीत आहे. आज सणाच्या दिवशी तर राजकारण करू नका. शिवसेना भवन परिसरात शिवसेनेच्यावतीनं निष्ठा हंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी ते आदित्य ठाकरे प्रसार माध्यमांशी बोलत होते. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, कुणी किती थर लावले याचे मला काही देणे नाही. मात्र त्यांनी ५० थर लावले की, त्यांचा थरकाप उडालाय हे जनतेला माहीत आहे. किमान सणासुदीच्या कार्यक्रमात तरी राजकारण नको. कारण प्रत्येक ठिकाणी राजकारण आणण्याची काही गरज नाही. २४ तास राजकारण केल्यास सणांचे महत्व राहणार नाही. 

काय म्हणाले होते मुख्यमंत्री -

ठाण्यातील टेंभी नाका येथे पूर्वापार चालत आलेल्या दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या दहीहंडी उत्सवाला आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी उपस्थित गोविंदांना संबोधित करताना शिंदेंनी राज्याच्या राजकारणात दीड महिन्यापूर्वी घडलेल्या राजकीय नाट्यावरून जोरदार टोलेबाजी केली. दीड महिन्यापूर्वी आम्ही सर्वात मोठी हंडी फोडली आणि ५० थर लावले, असं म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली होती. 

उद्धव ठाकरेंनी मागील दोन वर्षात सर्व सण व उत्सवांवर बंदी आणली होती. यावरून शिवसेना हिंदुत्वविरोधी असल्याची टीका विरोधकांकडून होत होती. यावर आदित्य म्हणाले की, आजचा दिवस सणाचा दिवस आहे. मला प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची गरज वाटत नाही. आम्ही हिंदुत्वविरोधी असू तुमचं धर्मावर जास्त प्रेम असेल तर तुम्ही सणात राजकारण आणणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू द्यात. आज सण आहे तो सणासारखा साजरा होऊ दे.

IPL_Entry_Point