मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aaditya Thackeray: पळून जाणारे आणि दगाबाज कधी विजयी होत नसतात - आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray: पळून जाणारे आणि दगाबाज कधी विजयी होत नसतात - आदित्य ठाकरे

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 27, 2022 05:55 PM IST

Aaditya Thackeray Slams Rebels: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray

Aaditya Thackeray on Supreme Court Decision: एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. तसंच, ११ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, असं स्पष्ट केलं. या निर्णयाबद्दल विचारलं असता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी थेट काही बोलण्यास नकार दिला. मात्र, दगाबाज आणि पळून जाणारे कधी विजयी होत नसतात, असा बोचरा टोला त्यांनी बंडखोर आमदारांना हाणला.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अद्याप मी वाचलेला नाही, असं आदित्य ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केलं. ‘फ्लोअर टेस्टसाठी आम्ही तयार आहोतच, ते तयार आहेत का हा प्रश्न आहे. फ्लोअर टेस्टपेक्षा त्यांनी डोळ्यांत डोळे घालून बोलले तरी पुरं आहे. बंड करायचं होतं तर इथंच हिंमतीनं करायला हवं होतं. राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जायला हवं होतं,' असं आदित्य म्हणाले. 'बंडखोरांमधील बरेच आमदार संपर्कात आहेत. विजयाचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि प्रेमही भरपूर मिळत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

कालपर्यंत शिवसेनेच्या सोबत असलेले उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत हे अचानक गुवाहाटीला पोहोचले आहेत. त्याबाबत विचारलं असता, ‘तो त्यांचा निर्णय आहे. पण कधी ना कधी त्यांना समोर यावंच लागणार आहे. डोळ्यात डोळे घालून बघावं लागणार आहे. बघूया,’ असा टोला आदित्य ठाकरे यांनी हाणला.

हे राजकारण नाही तर सर्कस - आदित्य ठाकरे

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयानं (ED) बजावलेलं समन्स यामागे राजकारण आहे का या प्रश्नावरही आदित्य यांनी भाष्य केलं. ‘हे राजकारण नाही. आता ही सर्कस झाली आहे,’ असा संताप आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या