मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena: मराठी माणसाला आपसात लढवणे हेच कमळाबाईचे मिशन; शिवसेनेने दाखलेच दिले!

Shiv Sena: मराठी माणसाला आपसात लढवणे हेच कमळाबाईचे मिशन; शिवसेनेने दाखलेच दिले!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 05, 2022 05:13 PM IST

Saamana Editorial on BJP: शिवतीर्थावर दोन गट पाडून कमळाबाईचा भाजप आनंदानं नाचत असल्याची टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे.

Saamana Editorial on HM Amit Shah Mumbai Visit
Saamana Editorial on HM Amit Shah Mumbai Visit (HT)

Saamana Editorial on HM Amit Shah Mumbai Visit : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आलेले आहेत. ते आज लालबागच्या राजाचं दर्शन घेणार असून मुंबईतील भाजप नेत्यांसोबत बैठकही घेणार आहेत. परंतु आता शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून अमित शहा यांच्या दौऱ्यावर आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं आलं आहे.

सामनातून लिहिलेल्या अग्रलेखात शिवसेनेनं म्हटलंय की, शिवसेनेशी दोन हात करता येत नाही, म्हणून फोडा, झोडा आणि आणि मजा पाहा, हेच तर कमळाबाईच्या भाजपचं मिशन आहे. आपापसांत झुंज लावण्याची ब्रिटिशनिती वापरली जातेय, शिवतीर्थावर दोन गट पाडून कमळाबाईचा भाजप आनंदानं नाचत असल्याचं जोरदार टिकास्त्र शिवसेनेनं भाजपवर सोडलं आहे.

कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार?

मराठी माणसाला आपापसांत लढवण्याचं कमळाबाईचं मिशन होतं. ज्यांचा पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारला त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार?, परंतु हे राज्य शिवरायांचं आहे, या ठिकाणी बाळासाहेबांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले आहेत. ते मेल्या आईचं दुख प्यायलेले नाहीत, याचं भान राखा. बाकी सारे शिवतीर्थावरच. असं म्हणत शिवसेनेनं दसरा मेळाव्याच्या वादावरून स्पष्टीकरण देत शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचं संकेत दिले आहेत.

जे मुघलांनी, ब्रिटिशांनी केलं तेच भाजपवाले करतायंत…

शिवसेनेनं भाजपवर टीका करताना अग्रलेखात कवी सुरेश भटांच्या गझलेमधील दोन ओळीही घेण्यात आल्या आहेत. त्यात 'जे अघटित घडले त्याचा मज अर्थ कळावा पैसा? पंसाच्या ओठांवरती कृष्णाचा पावा पैसा? हे वीर न शिवरायांचे, जे शरण भराभर गेले! ही झुंज फंदफितुरीची! हा गनिमी कावा पैसा?' सुरेश भटांच्या या ओळीही आज तंतोतंत लागू होतात. ब्रिटिशांना जे हवं होतं, तेच मोगलांना घडवायचं होतं. आता भाजपवालेही मराठी माणसांकडून तेच करवून घेत आहेत. फोडा झोडा आणि राज्य करा हीच भाजपची नीती असल्याची आरोप शिवसेनेनं केला आहे.

IPL_Entry_Point