Eknath Shinde : होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी, एकनाथ शिंदेंचा टोला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी, एकनाथ शिंदेंचा टोला

Eknath Shinde : होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी, एकनाथ शिंदेंचा टोला

Oct 12, 2024 08:47 PM IST

Eknath Shinde : त्यांना माझी दाढी खुपते, पण होती दाढी म्हणून उखडून टाकली तुमची महाविकास आघाडी महाविरोधी आघाडी, अशी टाकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

महाविकास आघाडी सरकार असताना आधीच्या सरकारच्या योजनांना ब्रेक लावण्याचा सपाटा सुरू केला होता. दिसेल त्या योजनांना ब्रेक लावला. समृद्धी महामार्ग योजनेला ब्रेक, मेट्रो ३ योजनेला ब्रेक, बुलेट ट्रेनला ब्रेक, जलयुक्त शिवार योजनेला ब्रेक, मराठवाडा ग्रीन फिल्डला ब्रेक, जिथं नाही ब्रोकर तिथं स्पीड ब्रेकर. त्यामुळे आम्ही हे स्पीड ब्रेकर उखडून टाकले तसेच हे सरकारही उखडून टाकले. त्यांना माझी दाढी खुपते, पण होती दाढी म्हणून उखडून टाकली तुमची महाविकास आघाडी महाविरोधी आघाडी, अशी टाकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.एकनाथ शिंदे म्हणाले की, जर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर लाडकी बहीण योजना आलीच नसती. म्हणून आम्ही या सरकारलाच उखडून फेकलं.

आमचं सरकार स्थापन झाल्यावर सहा महिन्यात आमचं सरकार पडणार असं ठाकरे म्हणत होते,पण घासून-पुसून नव्हे तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली. माझी दाढी यांना खुपते,पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

केवळ दोन वर्षात इतक्य कमी काळात हे सरकार राज्यातील लाडकं सरकार झालं आहे. लाडक्या बहिणींचे,भावांचे,शेतकऱ्यांचे लाडकं सरकार झालंय. अन्यायाला लाथ मारा अशी बाळासाहेबांची शिकवण. त्यामुळेच त्या विरोधात लढण्यासाठी आम्ही उठाव केला. हा उठाव केला नसता तर सच्च्या शिवसैनिकांचा अपमान झाला असता आणि महाराष्ट्र अनेक वर्षे मागे पडला असता. आमच्या सरकारने राज्याला नंबर एकवर आणलं. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांपासून शिवसेनेला मुक्त केलं.

तुम्ही बंगले बांधा अन् यांना चिखलात ठेवा -

'पहिल्या अडीच वर्षात काय झालं सर्वांना महितेय. २० वर्षे मुंबईत तुमची सत्ता होती. लोकांच्या सुख-दुःखाशी काही घेणं नव्हतं. धारावी हा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. पण त्यामध्येही काड्या करण्याचे धंदे सुरु आहेत. त्यांनी मुख्यमंत्री असताना प्रकल्प का रद्द केला. हे सर्वांना महितेय. तुम्ही बंगले बांधा अन् यांना चिखलात ठेवा.

तर लाडकी बहीण योजना आलीच नसती -

मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना वीज मोफत देणारं आमचं सरकार आहे. राज्यातील १० लाख लाडक्या भावांना सरकारने भत्ता दिला आहे. सर्वात मोठं मेट्रोचं जाळ करणारे हे राज्य बनले. मागील अडीच वर्षात सरकारने घेतलेले निर्णय पाहिले तर कुठे आले असे वाटेल. कोविड काळात घरात लपून बसणारा मुख्यमंत्री नाही. लोकांच्या हितासाठी लढणारा मुख्यमंत्री आहे. सत्तांतर झालं नसतं तर उद्योग आले नसते,नोकऱ्या मिळाल्या नसत्या. लाडक्या बहि‍णींची योजना आली नसती. शासन आपल्या दारी आले नसते. जेष्ठांना वयोश्री योजना आली नसती.

Whats_app_banner