मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : महाविकास आघाडीबाबत उद्धव ठाकरेंचे मोठे विधान, म्हणाले..

Uddhav Thackeray : महाविकास आघाडीबाबत उद्धव ठाकरेंचे मोठे विधान, म्हणाले..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 23, 2022 08:44 PM IST

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray ) यांनी महाविकास आघाडीबाबत मोठे विधान केले आहे. पुढे काय निर्णय घ्यायचा हे येणाऱ्या काळात सांगेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडीबाबत उद्धव ठाकरेंचे मोठे विधान
महाविकास आघाडीबाबत उद्धव ठाकरेंचे मोठे विधान

मुंबई  -  सत्तेत असताना व सत्तेतून पायउतार झाल्यानंतरही महाविकास आघाडीतूल कुरबुरी वारवार चव्हाट्यावर येत असतात.  काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमची आघाडी  नैसर्गिक  नसल्याचे व सोनिया गांधींनी आदेश दिल्याने सत्तेत सहभागी झाल्याचे तसेच पुढची निवडणूक स्वबळावर लढण्याचे जाहीर केले होते. आता शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी महाविकास आघाडीबाबत मोठे विधान केले आहे. 

महाविकास आघाडी फुटलेली नाही, आम्ही अजूनही एकत्रच आहोत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज विधिमंडळात बैठक पार पडली. ही बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना म्हटले की,  महाविकास आघाडी फुटलेली नसून आम्ही अजूनही एकत्रच आहोत. पुढे काय निर्णय घ्यायचा हे येणाऱ्या काळात सांगेन.

एकनाथ शिंदे यांना जवळपास ५० आमदारांना फोडून बंड घडवून राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता उलथवली होती. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करून मुख्यमंत्री पद मिळवले. 

आगामी काळात मुंबई, ठाण्यासह राज्यातील जवळपास १५ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज विधिमंडळात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका महाविकासआघाडी एकत्र लढणार असल्याचे बोलले जात आहे. 

IPL_Entry_Point