मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anil Babar death : खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांचं निधन, मंत्रिमंडळाची बैठक रद्द

Anil Babar death : खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांचं निधन, मंत्रिमंडळाची बैठक रद्द

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 31, 2024 10:30 AM IST

Eknath Shinde faction MLA Anil Babar passed away : सांगली जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले.

MLA Anil Babar passed away
MLA Anil Babar passed away

MLA Anil Babar passed away : शिंदे गटातील आमदार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू असलेले खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर (वय ७४) यांचे निधन झाले. 

न्यूमोनिया झाल्याने बुधवारी दुपारी त्यांना सांगली येथील एका रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून आज मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे. तर श्रीकांत शिंदे यांनी ट्विट करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. तर अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.

Thane crime : आता जिरेही बनावट! ठाण्यात बनावट जिरे बनविणारे रॅकेट उद्ध्वस्त, लाकडाचा भुसा अन् रसायनांचा वापर

अनिल बाबर यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. ते त्यांच्या अंत्यविधीसाठी आटपाडी येथे जाणार आहेत. शिंदे यांनी देखील ट्विट करून बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

अनिल बाबर हे ४ वेळा आमदार राहिले आहेत. १९९०, १९९९, २०१४, २०१९ २०१९ मध्ये ते निवडून आले. २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणून अपक्ष उमेदवार राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर हे वयाच्या १९ व्या वर्षी राजकारणात उतरले होते. सुरवातीला खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले. पाणीदार आमदार म्हणून त्यांची ओळख होती. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. ही योजना पूर्ण करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

Bank holidays in February : २९ दिवसांच्या फेब्रुवारी महिन्यात तब्बल ११ दिवस राहणार बँका बंद; वाचा यादी

शिवसेनेत फुट पडल्यावर त्यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू घेत ते गुवाहाटीला गेले होते. बाबर हे महाविकास आघाडीवर उघडपणे टीका करत होते. ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी देण्यात आलेल्या शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अनिल बाबर यांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते.

बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले.

WhatsApp channel