मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shirdi Saibaba : कर्नाटकच्या भाविकाकडून शिर्डी साईबाबांचरणी भरभरून दान, २९ लाखांचा सोन्याचा मुकुट अर्पण

Shirdi Saibaba : कर्नाटकच्या भाविकाकडून शिर्डी साईबाबांचरणी भरभरून दान, २९ लाखांचा सोन्याचा मुकुट अर्पण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 09, 2024 04:37 PM IST

Shirdi Saibaba : बेंगळुरूमधील भक्ताने तब्बल २९ लाख रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट साईचरणी अर्पण केला आहे.

Shirdi Saibaba
Shirdi Saibaba

देशातील श्रीमंत देवस्थानापैकी एक असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या तिजोरीत दररोज लाखोंचे दान पडत असते. साईबाबांच्या दर्शनाला भक्तांनी नेहमीच गर्दी असते. नववर्षाच्या स्वागतालाही साईभक्तांची साईबाबांच्या दर्शनासाठी रांग लागली होती. देशविदेशातून असंख्य भक्त साईचरणी लीन होण्यासाठी येत असतात.

शिर्डीमध्ये दररोज हजारो भाविकांची दर्शन रांगेत गर्दी दिसत असते. त्यातील अनेक भाविक साईबाबांच्या चरणी आपल्या ऐपतीप्रमाणे दान अर्पण करत असतो. आज (९ जानेवारी) बेंगळुरूमधील राजाराम कोटा यांच्या परिवाराने शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले. या कुटूंबाकडून २९ लाख रूपये किमतीचा सोन्याचा मुकुट साईबाबा चरणी अर्पण करण्यात आला. कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवले यांच्याकडे हा मुकूट सुपूर्द करण्यात आला. आज साईंच्या मुर्तीवर हा मुकूट चढवण्यात आला होता.

साईचरणी लीन झालेला भक्त आपापल्या परीने वस्तू किंवा रोख रकमेचे दान देत असतो. बेंगळुरूमधील भक्ताने तब्बल २९ लाख रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट साईचरणी अर्पण केला आहे.

नववर्षानिमित्त शिर्डी देवस्थान समितीकडून शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिर्डीत २३ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान आठ लाख भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. तसेच याकाळात भक्तांनी तब्बल १६ कोटींचे दान साईचरणी अर्पण केल्याचे मंदिर ट्रस्टने सांगितले आहे.

WhatsApp channel

विभाग