शिर्डी हादरली! साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची एकाच दिवशी हत्या! दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापडले मृतदेह
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिर्डी हादरली! साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची एकाच दिवशी हत्या! दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापडले मृतदेह

शिर्डी हादरली! साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची एकाच दिवशी हत्या! दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापडले मृतदेह

Feb 03, 2025 01:01 PM IST

Shirdi Murder: शिर्डीमध्ये आज सकाळी देवस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. दोघांचेही मृतदेह हे वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

शिर्डी हादरली! साई संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांची एकाच दिवशी हत्या! दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापडले मृतदेह
शिर्डी हादरली! साई संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांची एकाच दिवशी हत्या! दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापडले मृतदेह

Shirdi Murder: दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये शिर्डीच्या साई संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष साहेबराव घोडे (साई संस्थान कर्मचारी, घटना घडली कर्डोबा नगर चौक), नितीन कुष्णा शेजुळ (साई संस्थान कर्मचारी, घटना घडली साकुरी शिव) असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर कृष्णा देहरकर (रा. श्रीकृष्णानगर) हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

काय आहे नेमकी घटना ?

शिर्डीमध्ये आज सोमवारी पहाटे तिघांवर चाकू हल्ला करण्यात आला. यात शिर्डी देवस्थानच्या दोघांचा समावेश आहे. दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. एका तासाच्या अंतरात तब्बल तिघांवर चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. मृत सुभाष साहेबराव घोडे हे करडोबा नगर चौकाचे रहिवासी असून .नितीन कृष्णा शेजुळ यांच्यावर साकुरी शिव तर गंभीर जखमी असलेल्या कृष्णा देहरकर याच्यावर श्रीकृष्ण नगर भागात चाकू हल्ला करण्यात आला. काही अज्ञात हल्लेखोरांनी हे तिघे पहाटे ड्युटीवर जात असतांना त्यांच्यावर चाकू हल्ल्या करण्यात आला. या दोघांची नेमकी हत्या का करण्यात आली याचे कारण समजू शकले नाही. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

घटनेवर काय म्हणाले सुजय विखे पाटील ?

या घटनेवर सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करण्यात आले आहे. ही घटना ४ वाजता घडली. यावेळी परिसरातील नागरिक झोपेत होते. शिर्डीत मोफत अन्नछत्र, तसेच अनेक मोफत सुविधा करून ठेवल्याने शिर्डीत गुन्हेगारी वाढली असून हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हे हल्ले ठरवून करण्यात आलेले नाही. हे रँडम मर्डर आहेत. व्हाईटनरची नशा करतात तसे हे हल्लेखोर असावे. पैशांसाठी हे हल्ले करण्यात आले असावे. दुपारपर्यंत हे आरोपी ताब्यात असतील. या साठी पोलिसांना अॅक्शन मोडवर काम करावे लागेल, असे सुजय विखे म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर