मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक! पाकिस्तानला जाणाऱ्या चीनी जहाजात मोठा न्यूक्लियर मिसाइल साहित्याचा साठा; मुंबईतल्या JNPA बंदरात तपास सुरू

धक्कादायक! पाकिस्तानला जाणाऱ्या चीनी जहाजात मोठा न्यूक्लियर मिसाइल साहित्याचा साठा; मुंबईतल्या JNPA बंदरात तपास सुरू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 03, 2024 08:06 AM IST

ship from china to pak stopped at mumbai port : चीनमधून पाकिस्तानला जाणारे एक कार्गो जहाज मुंबईच्या जेएनपीए (Mumbai JNPA Port Ship) बंदरावर थांबवण्यात आले. या जहाजात काहीतरी असण्याची भीती सुरक्षा यंत्रणांना आहे, ज्याचा वापर पाकिस्तानच्या आण्विक व बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी केला जाऊ शकतो.

पाकिस्तानला जाणाऱ्या चीनी जहाजात मोठा न्यूक्लियर मिसाइल साहित्याचा साठा
पाकिस्तानला जाणाऱ्या चीनी जहाजात मोठा न्यूक्लियर मिसाइल साहित्याचा साठा

china nuclear cargo suspected : चीनमधून मुंबईमधील जेएनपीए बंदरावर आलेल्या एका जहाजाला भारतीय सुरक्षा दलाने अडवले असून या जहाजात पाकिस्तानात आण्विक क्षेपणास्त्र बनवण्यासाठी लागणारे साहित्य असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गृप्तहेरांनी सीमा शुल्क अधिकाऱ्यांना या जहाजाविषयीची माहिती दिली होती. CMA-CGMहे जहाज चीनहून पाकिस्तानात जात होते. सध्या या जहाजाची तपासणी सुरू आहे.

Maharashtra weather update : राज्यात आजही पाऊस! विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह बरसणार! असे असेल हवामान

चीनमधून पाकिस्तानला जाणारे जहाज मुंबईत थांबवण्यात आले आहे. या जहाजात पाकिस्तानच्या आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी वापरण्यात येणारे आण्विक साहित्य असल्याची माहिती आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून, सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी २३ जानेवारी रोजी बंदरावर माल्टा ध्वजांकित व्यापारी जहाज CMA CGM Attila अडवले. तपासादरम्यान, त्यात एक कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल (सीएनसी) मशीन देखील सापडले, जे एका इटालियन कंपनीने बनवले होते.

Pune Traffic issue : पुण्यात अवजड वाहनांना 'नो एन्ट्री'! वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; वाचा

सीएनसी मशीन संगणकाद्वारे नियंत्रित केली जाते. डीआरडीओच्या पथकाने देखील जहाजात असलेल्या मालाचीही तपासणी केली. जहाजात भरलेल्या वस्तूंचा वापर शेजारील देश त्याच्या आण्विक कार्यक्रमासाठी करू शकतो, असे तपासात समोर आले आहे. तज्ज्ञांच्या मते पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात हे उपकरण महत्त्वाचे ठरू शकते. हे उल्लेखनीय आहे की १९९६ पासून, सीएनसी मशीन वासेनार व्यवस्थेमध्ये समाविष्ट केल्या गेल्या आहेत. हे एक आंतरराष्ट्रीय शस्त्र नियंत्रण आहे, ज्याचे उद्दिष्ट नागरी आणि लष्करी दोन्ही वापरासह उपकरणांचा प्रसार रोखणे आहे.

Pune traffic news : पुणे विद्यापीठ चौकातील कोंडी सोडवण्यासाठी वाहतुकीत मोठा बदल; अशी आहे व्यवस्था

काय आहे सीएनसी मशीन

उत्तर कोरियामध्ये अण्वस्त्र कार्यक्रमांसाठी सीएनसी मशीनचा वापर करण्यात आला. याबाबत मुंबई बंदर अधिकाऱ्यांनी भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांना सतर्क केले होते. त्यानंतर तपासणी करून माल जप्त करण्यात आला. अधिका-यांनी सांगितले की, सुरक्षा एजन्सींच्या तपासात असे सूचित झाले आहे की तब्बल २२,१८० किलो वजनाचे हे यंत्र तैयुआन मायनिंग इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कंपनी लिमिटेडने पाठवले होते. कॉसमॉस इंजिनीअरिंगसाठी ते पाकिस्तानला नेण्यात आले. चीनमधून पाकिस्तानला पाठवल्या जाणाऱ्या अशा दुहेरी वापराच्या लष्करी दर्जाच्या वस्तू जप्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, युरोप आणि अमेरिकेने ज्या गोष्टींवर बंदी घातली आहे अशा गोष्टी पाकिस्तानला चीनकडून मिळू शकतात ही चिंतेची बाब आहे. पाकिस्तानच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांना चीनचा पाठिंबाही त्रासदायक आणि धोकादायक आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की २०२० मध्ये, क्षेपणास्त्र बनविण्यासाठी एक विशेष ऑटोक्लेव्ह पाकिस्तानला जाणाऱ्या चिनी जहाजावर औद्योगिक उपकरणे म्हणून लपवण्यात आले होते. या संशयित पाकिस्तानी संस्थांनी संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संघटनेला (DESTO) या दुहेरी वापराच्या साहित्याचा पुरवठा केला आहे का हे शोधणे हा तपासाचा उद्देश आहे.

IPL_Entry_Point