मी एक महिला आहे, माल नाही! अरविंद सावंत यांच्या 'त्या' वक्तव्यावरून शायना एनसी भडकल्या! थेट पोलीस ठाणं गाठलं!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मी एक महिला आहे, माल नाही! अरविंद सावंत यांच्या 'त्या' वक्तव्यावरून शायना एनसी भडकल्या! थेट पोलीस ठाणं गाठलं!

मी एक महिला आहे, माल नाही! अरविंद सावंत यांच्या 'त्या' वक्तव्यावरून शायना एनसी भडकल्या! थेट पोलीस ठाणं गाठलं!

Nov 01, 2024 07:53 PM IST

Shaina NC on Arvind Sawant: भायखळा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या शायना एनसी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले.

अरविंद सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शायन एनसी यांची प्रतिक्रिया
अरविंद सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शायन एनसी यांची प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आता प्रचाराला वेग आला आहे. भायखळा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या उमेदवार शायना एन.सी. यांच्याबाबत अपशब्द वापरला. यानंतर शायना एनसी आपल्या समर्थकांसह अरविंद सावंत यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी नागपाडा पोलीस ठाण्यात पोहोचल्या आहेत.

मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसच्या अमिन पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. अमिन पटेल यांचा प्रचार करण्याकरता अरविंद सावंत २९ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांच्या मतदारसंघात गेले. शायना एन. सी याआधी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक होत्या. परंतु, त्यांना मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. याबाबत अरविंद सावंत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'त्यांची अवस्था पहा. त्या आयुष्यभर भाजपमध्ये राहिल्या आणि निवडणुकांपूर्वी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पण इथे इम्पोर्टेड माल चालत नाही. आमच्या येथे ओरिजनल माल चालतो', असे अरविंद सावंत म्हणाले.

शायना एनसी यांनी दिली अशी प्रतिक्रिया

अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर शायना एनसी यांनी संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, ‘अरविंद सावंत यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या पक्षाची मानसिकता दर्शवते. मुंबादेवी येथील प्रत्येक स्त्री माल आहे, असे त्यांना वाटते का? हे लोक एखाद्या महिलेचा सन्मान करू शकत नाहीत. म्ही सक्षम स्त्रीला राजकारणात माल म्हणता. तुम्ही एका महिलेला माल म्हटले आहे. मी या प्रकरणी कारवाई करू किंवा नाही, पण याचे उत्तर जनता त्यांना नक्कीच देईल. हे तेच अरविंद सावंत आहेत, ज्यांच्यासाठी आम्ही २०१४ आणि २०१९ मध्ये प्रचार केला होता. पण त्यांची मनःस्थिती, विचार आणि कल्पनाच आहे की, ते एका स्त्रीला माल म्हणत आहेत.’

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गटात प्रवेश

मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून शायना एनसी या शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढत आहेत. शायना दीर्घकाळ भाजपमध्ये होत्या आणि अनेकदा टीव्ही डिबेटमध्ये पक्षाचे प्रतिनिधित्व केले.परंतु, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या.

 

महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यात महाविकास आणि महायुती यांच्यात मुख्य लढत होणार आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर