मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Santosh Bangar Hingoli : शिंदे गटाच्या आमदाराने टीका करणाऱ्या नेटकऱ्यांना धमकावलं, म्हणाले...

Santosh Bangar Hingoli : शिंदे गटाच्या आमदाराने टीका करणाऱ्या नेटकऱ्यांना धमकावलं, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 28, 2023 12:52 PM IST

Santosh Bangar News : सोशल मीडियावर टीका करणाऱ्या नेटकऱ्यांना शिंदे गटाच्या आमदाराने धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Santosh Bangar Hingoli News
Santosh Bangar Hingoli News (HT)

Santosh Bangar Hingoli News : सोशल मीडियावर टीका केली म्हणून शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी नेटकऱ्यांना ठेचून मारण्याची धमकी दिली आहे. नांदेड येथील कार्यक्रमात बोलताना आमदार संतोष बांगर यांनी नेटकऱ्यांना धमकी दिली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. त्यामुळं आता आमदार संतोष बांगर यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नव्या वादाला तोंड फुटणार आहे. आमदार संतोष बांगर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे.

नांदेडमधील शिवसेनेच्या (शिंदे गट) मेळाव्यात बोलताना आमदार संतोष बांगर म्हणाले की, आपल्यावर आणि आपल्या नेत्यांवर टीका करणाऱ्या लोकांना ठेचण्याचं काम करावं लागणार आहे. फेसबुक आणि व्हाट्सअॅपच्या माध्यमातून त्याला तिथल्या तिथे ठेचण्याचं काम करावं करावं लागणार आहे, असं म्हणत आमदार संतोष बांगर यांनी नेटकऱ्यांना धमकी दिली आहे. त्यानंतर आता आमदार बांगर यांच्या वक्तव्यावरून नवा वाद पेटण्याची चिन्हं आहे.

याशिवाय त्यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. शिवसेनेचं जिल्हाप्रमुखपद हवं असेल तर राऊतांना पाच तोळ्यांची चैन द्यावी लागते, विनायक राऊतांच्या क्रिकेट टूर्नामेंटसाठी मीच पैसे दिले होते, ठाकरे गटातील अनेक नेते पैसे गोळा करण्याचं काम करत असल्याचा आरोपही शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धमकी दिली होती. त्यामुळं त्यांच्यावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा नेटकऱ्यांना धमकावल्यामुळं विरोधक यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point