मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMC Election 2022 : महापालिका निवडणुका लवकरच? नव्याने प्रभागरचना करण्याचे शिंदे सरकारचे आदेश

BMC Election 2022 : महापालिका निवडणुका लवकरच? नव्याने प्रभागरचना करण्याचे शिंदे सरकारचे आदेश

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 22, 2022 11:23 PM IST

New Ward Structure in Mumbai : शिंदे फडणवीस सरकारने आज मुंबईसह अन्य महापालिकांची नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील प्रभाग रचनेसंदर्भातील खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना व न्यायालयाने प्रभाग रचना जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले असतानाही राज्य सरकाने हे आदेश दिले आहेत.

मुंबईत नव्याने प्रभाग रचना
मुंबईत नव्याने प्रभाग रचना

BMC Election News : राज्यात महापालिका निवडणुकांची चाहुल लागल्याची चिन्हे दिसत आहेत. महापालिका निवडणुकीसंदर्भातील एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिंदे सरकारने नव्याने प्रभाग रचना तयारकरण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महापालिकेत आता नव्याने प्रभाग रचना अस्तित्वात येणार असून याचा मोठा परिणाम मुंबईसह अन्य शहरातील महापालिकांवरही पडून शकतो. नव्याने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश नगर विकास विभागाने जारी केले आहेत. त्यामुळेच येणाऱ्या पालिका निवडणुका नव्याप्रभाग रचनेनुसार होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

कोरोना महामारीमुळे मुदत संपूनही गेल्या दोन वर्षांपासून महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहे. अशा महापालिकांसह सध्या प्रशासकीय राजवट असलेल्या महापालिकांमध्ये येत्या काळात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबईतील प्रभाग रचनांवरील खटले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने नव्या प्रभाग रचनांना जैसे थे चे आदेश दिले होते. यामुळे जुन्याच प्रभाग रचनांवर निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात असताना शिंदे सरकारने नव्या प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. यातच नवीन मुंबई, औरंगाबादच्या निवडणूक दोन वर्षापेक्षा अधिक काळापासून, तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही फेब्रुवारीपासून प्रलंबित आहे. यातच अनेक ठिकाणी प्रशासक हे पालिकेचे कामकाज सांभाळत आहेत.या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टातही केस सुरु आहे. त्याचवेळी शिंदे सरकारचा हा आदेश समोर आला आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या