मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Talathi Bharati 2023 : महाराष्ट्रात ४६२५ तलाठी पदासाठी मेगाभरती, शिंदे-फडणवीस सरकारने काढले आदेश

Maharashtra Talathi Bharati 2023 : महाराष्ट्रात ४६२५ तलाठी पदासाठी मेगाभरती, शिंदे-फडणवीस सरकारने काढले आदेश

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jun 03, 2023 06:15 PM IST

Maharashtra Talathi Bharati : साडेचार हजारांहून अधिक जागांवर भरती करण्यात येणार आहे. त्यामुळं आता राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Talathi Bharati 2023 News Updates
Maharashtra Talathi Bharati 2023 News Updates (HT)

Maharashtra Talathi Bharati 2023 News Updates : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या तलाठी भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील ४६२५ तलाठी पदांसाठीच्या मेगाभरतीचे आदेश काढले आहे. सप्टेंबर महिन्यात तलाठी पदांची भरती होणार असल्यामुळं बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महसूल व वन विभागाने या भरतीबाबतचा आदेश जारी केला असून या पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच तलाठी पदभरतीसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन परिक्षा घेण्याबाबतची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील ४६२५ तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश काढले आहे. त्याची जाहिरात काढण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. महसूल विभागाने काढलेली जाहिरात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी कार्यालयांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नव्या जाहिरातीतील पदसंख्या आणि आरक्षणाच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय भरती प्रक्रियेचे सर्वाधिकार महसूल विभागाकडे असल्याने प्रत्येक बदलाबाबत उमेदवारांना अपडेट्स देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तलाठी भरतीवेळी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर त्यांना सप्टेंबर महिन्यात ऑनलाईन परिक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात येईल. उमेदवार ज्या जिल्ह्यातील आहे, त्याच जिल्ह्यातून त्याला भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना उपविभाग नेमून देण्याचे सर्वाधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना असणार आहे. त्यामुळं आता एमपीएससी नंतर राज्यातील तलाठी पदांची मोठी मेगाभरती निघाल्याने तरुणांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

IPL_Entry_Point