मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली, पहिल्या टप्प्यात ‘इतके’ आमदार घेणार शपथ

मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली, पहिल्या टप्प्यात ‘इतके’ आमदार घेणार शपथ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jul 16, 2022 03:20 PM IST

Shinde-Fadnavis Cabinet Expansion : शिंदे गटानं ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. तर भारतीय जनता पक्षाला एकूण २९ कॅबिनेट मंत्रीपदं हवी आहेत.

Shinde-Fadnvis Cabinet Expansion In Maharashtra
Shinde-Fadnvis Cabinet Expansion In Maharashtra (HT)

Shinde-Fadnvis Cabinet Expansion In Maharashtra : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन १५ दिवसांचा कालावधी लोटलेला असताना अजूनही मंत्रिमंडळाचा कोणताही विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाच्या तीन बैठका केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आहेत. त्यामुळं आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीनंतर म्हणजेच १९ ते २१ जुलैदरम्यान केवळ १० मंत्र्यांचा शपथविधी होण्याची माहिती समोर आली आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यानं कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीनं शिंदे सरकारवर जोरदार टीका केली होती. याशिवाय आमदारांच्या नाराजीची भीती आणि मंत्रिपदांच्या वाटणीवरून शिंदेगट आणि फडणवीसांमध्ये एकवाक्यता नसल्यानं मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला असल्याचं बोललं जात आहे. या राजकीय स्थितीचे पडसाद राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत उमटण्याची चिन्ह आहेत. त्यामुळं ही निवडणुक झाल्यानंतर १९ किंवा २१ जुलैला मोजक्या काही १० टॉप मंत्र्याचा शपथविधी होण्याची शक्यता असल्याचं वृत्त एका मराठी वृत्तपत्रानं दिलं आहे.

पहिल्या टॉप १० मंत्र्यांमध्ये शिंदे आणि फडणवीसांच्या जवळच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश असेल. याशिवाय जे आमदार शिंदे यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते, त्यांनाही मंत्रिमंडळात सामावून घेतलं जाणार की नाही, याबाबत अजून साशंकता आहे. भाजपला अर्थ, गृह आणि जलसंपदा खातं तर शिंदे गटाला नगरविकास आणि महसूल खातं मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. याशिवाय जेष्ठ नेते किंवा माजी मंत्र्यांशिवाय अनेक चर्चित आमदारदेखील मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहे.

मंत्रिमंडळात किती मंत्री असतील?

विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या १५ टक्के आमदारांची नियुक्ती मंत्रिपदावर करता येते, त्याचा उल्लेख घटनेच्या कलम ७२ च्या १अ मध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांची संख्या २८८ असल्यानं त्यातील ४२ आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. ठाकरे सरकारनं शपथ घेतल्यानंतर विधिमंडळातील ४१ आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली होती.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या