तरुणांसाठी गुडन्यूज; नमो महारोजगार मेळाव्यांमधून निर्माण होणार २ लाख रोजगाराच्या संधी-shinde cabinet decision namo maharojgar melava created two lakh jobs ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  तरुणांसाठी गुडन्यूज; नमो महारोजगार मेळाव्यांमधून निर्माण होणार २ लाख रोजगाराच्या संधी

तरुणांसाठी गुडन्यूज; नमो महारोजगार मेळाव्यांमधून निर्माण होणार २ लाख रोजगाराच्या संधी

Feb 05, 2024 08:46 PM IST

Namo Maharojgar Melava : छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व कोकण या विभागांमध्ये महारोजगार मेळावे आयोजित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Namo Maharojgar Melava
Namo Maharojgar Melava

नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यभरातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नोकरीसाठी इच्छुक तरुणांसाठी राज्य सरकार रोजगार मेळावे भरवणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल २ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. याविषयीचा निर्णय सोमवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीच जनहिताचे तब्बल २० निर्णय घेण्यात आले. राज्यातील युवकांच्या हाती काम देण्यासाठी राज्य सरकार रोजगार मेळावे घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व कोकण या विभागांमध्ये महारोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. यावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

यापुर्वी नागपूर येथे प्रथमच राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन चालू वर्षी प्रत्येक महसूली विभागात एक याप्रमाणे सहा नमो महारोजगार मेळावे देखील आयोजित करण्याचे ठरले. या मेळाव्यांमार्फत राज्यातील किमान दोन लाख उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. या मेळाव्यांसाठी प्रति मेळावा ५ कोटी याप्रमाणे ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या मेळाव्यांसाठी विविध विभागांवर जबाबदारी देण्यात आली असून उद्योजकांसह विविध घटकांना सहभागी करून घेण्यात येत आहे.

Whats_app_banner