Sheena Bora Murder Case : मुंबईतील हायप्रोफाईल शीना बोरा हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या हत्याकांडातील एक महत्त्वाचा पुरावा गायब झाला आहे. सरकारी वकिलांनी या प्रकरणाची माहिती मुंबईच्या विशेष सीबीआय कोर्टातदिली आहे. पोलिसांनी पुरावा म्हणून जो सांगाडा शीना बोराचा (Sheena Bora) म्हणून जप्त केला होता,तो सांगडा आणि हाडं गायब झाली आहेत. २०१२ मध्ये शीना बोराची हत्या केल्यानंतर त्याचवर्षी पोलिसांनी हा सांगाडा पुरावा म्हणून जप्त केला होता. सरकारी वकिल सी. जे. नंदोडे यांनी याबाबत विशेष सीबीआय कोर्टात हा सांगडा सापडला नसल्याची माहिती दिली.
मृतदेहाच्या सांगाड्यातील जळालेली हाडं सीबीआयला सापडली नाहीत. सत्र न्यायालयातील सुनावणीमध्ये सीबीआयने या प्रकरणातील साक्षीदार हजरच केले नाहीत. सीबीआय जप्त केलेल्या सांगाड्यातील काही हाडं कोर्टात सादर करणार होती. तसेच याहाडांच्या आधारावर जेजे रुग्णालयातील अनाटॉमी विभागाचे साहाय्यक प्राध्यापकांची साक्ष होणार होती. मात्र ही हाडं सापडत नसल्याची माहिती सीबीआयच्या वकिलांनी कोर्टात माहिती दिली.
जे जे रुग्णालयातील फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉक्टर जेबा खान यांनी २०१२ मध्ये फॉरेन्सिक लॅबमध्ये हाडांचा तपास केल्यानंतर ही माणसाचीच हाडं असल्याचा निष्कर्ष दिला होता. आता सांगाडा आणि हाडं गायब झाल्याने डॉ. जेबा खान यांचा जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास सरकारी वकिलांनी तयारी दर्शवली आहे. प्रकरणातील महत्वाचा पुरावा गायब करून खटला कमकुवत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.
शीना बोराची हत्या तिची आई इंद्राणी मुखर्जीने केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. इंद्राणीचा पहिला पती संजीव खन्ना आणि गाडी चालक ड्रायव्हर श्यामवर रायने2012मध्ये शीना बोराची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह रायगड जिल्ह्यातील पेन गावात आणला आणि तिथे तो जाळण्यात आल्याचा आरोप आहे.
पेन पोलिसांनी २०१२ मध्ये मृतदेहाचे अवशेष जप्त केले आणि तपासासाठी ते जे जे रुग्णालयात पाठवले. इंद्राणी मुखर्जीचा चालक श्याम राय याच्या अटकेनंतर हत्याकांडाचा खुलासा झाला. २०१५ मध्ये मुंबई पोलिसांनी रायगडमध्ये जाऊन आणखी काही अवशेष जप्त केल आणि तपासासाठी दिल्लीत एम्समध्ये पाठवले. २०१२ मध्ये सापडलेले अवशेष आणि २०१५ मध्ये सापडलेले अवशेष एकाच व्यक्तीचे आहेत की नाही, मृतदेहाचं वय आणि मृत्यूचं कारण शोधण्यासाठी हाडं आणि सांगाडा ठेवण्यता आला होता. तो सांगाडाच आता गायब झाला आहे.
शीना बोरा हत्याकांडात आतापर्यंत बरेच ट्विस्ट आले आहेत. इंद्राणी मुखर्जीवर शीना बोराची हत्या केल्याचा आरोप आहे. या सुनावणीवेळी शीना बोरा जिवंत असून तिला विमानतळावर पाहण्यात आल्याचा धक्कादायक दावाही न्यायालयात करण्यात आला होता.
संबंधित बातम्या