शीना बोरा मर्डर केसमधील मुख्य आरोपींपैकी एक इंद्राणी मुखर्जीने आरोप केला की, या प्रकरणाच्या तपासात हेराफेरी करण्यात आली आहे. तिने म्हटले की, २०१२ मध्ये कोणताही सांगाडा मिळाला नव्हता. पोलिसांनी जप्त केलेले अवशेष गायब झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. शीना बोराचे अवशेष सापडत नसल्याची माहिती सरकारी पक्षाने केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयात दिल्यानंतर मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने दावा केला की, २०१२ मध्ये सांगाड्याचे अवशेष सापडले नाहीत आणि हा संपूर्ण कट केवळ 'रचलेली कथा' आहे.
शीना बोराचा प्रियकर राहुल मुखर्जी याला या हत्येप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात यावे, कारण बोरा यांना जिवंत पाहणारा तो शेवटचा व्यक्ती होता. इंद्राणी मुखर्जीने एएनआयला सांगितले की, "माझ्या वैयक्तिक मते, मला वाटते की मे २०१२ मध्ये कधीही सांगाड्याचे अवशेष सापडले नाहीत. सीबीआयसारख्या प्रमुख एजन्सीच्या ताब्यातून या प्रकारचे महत्त्वाचे पुरावे गहाळ होऊ शकतात, याखेरीज हे सर्व एक बनाव होता. त्यामुळे तो पुरावा कधीच अस्तित्वात नव्हता, असे मला वाटते.
अनेक प्रकारच्या एजन्सी आणि संघटनांच्या हस्तक्षेपामुळे तपासात ढिसाळपणा झाला. मला वाटते की तपास अर्धवट होता आणि प्रत्येकजण माझ्यावर आरोप करण्याची घाई करत होता. कारण त्यांच्याकडे तपासाचा वेळ निघून जात होता.
पीडितेच्या कथित अवशेषांच्या प्राथमिक डीएनए अहवालांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मुखर्जी म्हणाली की, "डीएनए तज्ञांना डीएनए अहवाल तयार करण्यासाठी खूप खाडाखोड करावी लागली होती. सापडलेल्या सांगाड्याचा डीएनए माझ्याशी जुळल्याचा बनाव केला गेला. याबद्दल आवश्यक लोकांची पुन्हा चौकशी केली पाहिजे. त्याची कोठडीत चौकशी व्हायला हवी.
शीना बोरा हिचा प्रियकर राहुल मुखर्जी याच्या कथित हत्या प्रकरणात असलेल्या भूमिकेवरही मुखर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणी चौकशीसाठी राहुलला ताब्यात घेण्यात यावे, असे त्या म्हणाल्या. राहुल मुखर्जी माझ्या मुलीचा मंगेतर असल्याचा दावा करत असल्याने आणि तिने तिला शेवटचे पाहिले होते, असे मला ठामपणे वाटते, त्यामुळे मला वाटते की त्याला कोठडीत घेण्याची गरज आहे. मुखर्जी यांनी सांगितले.
शीना बोरा हत्या प्रकरणातील सरकारी पक्षाने एप्रिल २०१२ मध्ये पेण पोलिसांनी जेजे रुग्णालयात तपासणीसाठी पाठवलेले अवशेष सापडत नसल्याची माहिती सीबीआयच्या विशेष न्यायालयात दिली. मात्र, २०१२ मध्ये गोळा करण्यात आलेल्या अवशेषांचा डीएनए अहवाल यापूर्वीच तपासण्यात आल्याने त्यांची केस कमकुवत होणार नाही, असे सीबीआयने म्हटले आहे.
शीना बोरा हिची २४ एप्रिल २०१२ रोजी हत्या करून तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जंगलात फेकून देण्यात आला होता. तिची आई इंद्राणी मुखर्जीने तिचा माजी पती संजीव खन्ना याच्यासोबत मिळून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह जंगलात जाळून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला होता.
संबंधित बातम्या