SharadPonkshe Controversial Statement : वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारेजेष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी नागपुरात केलेल्या एका नव्या विधानाने वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपुरात आयोजित शिवराज्याभिषेक (shiv rajyabhishek din) सोहळ्यात बोलताना शरद पोंक्षे म्हणाले की, शिवाजी महाजारांच्या काळात गांधीजी नव्हते ते बरं झालं, नाहीतर महाराज अहिंसक झाले असते. अहिंसेच्या शिकवणीमुळे महाराज प्रतापगडावर अफजलखानाला भेटायला निशस्त्र गेले असते आणि संपले असते. असं वादग्रस्त वक्तव्य शरद पोंक्षे (Sharadponkshe) यांनी केलं आहे.
शरद पोंक्षे म्हणाले की, अहिंसेला परमो धर्म म्हणणाऱ्या महात्मा गांधींचा जन्म शिवकाळात झाला नव्हता हे आपलं नशीब आहे. नाहीतर शिवाजी महाराज महात्मा गांधीचा आदर ठेवत अहिंसक बनले असते व अफजल खानाला भेटायला निशस्त्र गेले असते. त्यामध्ये महाराजच संपले असते.
अफजलखानाने महाराजांना एकटं आणि निशस्त्र बोलावलं होतं. मात्र छत्रपती शिवाजी महाराज चतूर होते त्यांनी त्याचा डाव ओळखून सोबत जीव महाल नेला आणि वाघनखंही नेली. ते शस्त्र घेऊन खानाच्या भेटीला गेले. अहिंसा परमो धर्म असे म्हणणाऱ्या महात्मा गांधींचा त्या काळात जन्म झाला नाही हे आपलं नशीब. नाहीतर आपले महाराज एवढे सज्जन होते, संतांचा आदर राखणारे होते. त्यामुळे त्यांनी गांधींचा आदर ठेवत ते अहिंसक झाले असते आणि खानाला भेटायला निशस्त्र गेले असते, मात्र त्यावेळी महाराज संपले असते.
अन्य धर्मात गेलेल्यांची हिंदू धर्मात घर वापसी हे भाजप आणि संघाचे विचार नाहीत. घर वापसीची सुरुवात भाजप आणि स्वंयसेवक संघानं केलेली नाही. तर अशी घर वापसी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केल्याचं शरद पोंक्षे म्हणाले. शिवाजी महाराजांनी केवळ नेताजी पालकरच नाही तर मुस्लिम धर्मात गेलेल्या हजारो लोकांना परत हिंदू धर्मात आणले. त्यासाठी त्यांची शुद्धी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध करण्याआधी त्याला अनेक पत्रे पाठवून नमती भूमिका घेतली. आपण खानाला घाबरत असल्याचे भासवून त्याला प्रतापगडावरून पायथ्याला येण्यास भाग पाडलं. त्यानंतर महाराजांनी श्रीकृष्णाच्या नीतीने त्याचा वध केला. त्याच एक गोष्टी चांगली झाली की, त्या काळात संभाजी ब्रिगेडसारख्या दरिद्री संस्था आणि ब्रिगेडी लोक नव्हते. नाही तर त्यांनी महाराजांवर चीका केली असती की, अफजल खान महाराष्ट्रातील जनतेची लूट करत असताना, मंदिरे उद्वस्त करत असताना महाराज प्रतापगडावर बसून राहिले.
अफजलखानाने तुळजाभवानीची मूर्ती फोडली, पंढरपूरमध्ये नासधूस केली. मंदिरात गो हत्या करून पुजाऱ्यांना गोमांस खायला लावले, मात्र तरीही छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या खाली उतरले नाहीत. त्या काळात जर ब्रिगेडी लोक असते तर महाराजांना शिव्या दिल्या असत्या.